राज्य सहकारी बँक्स असोसिएशन चा सर्वोत्कृष्ट जिल्हा बँक म्हणून लातूर जिल्हा बँकेला कै.वैकुंठभाई मेहता पुरस्कार प्रदान
नाशिक येथे शानदार सोहळ्यात भारताचे माजी मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते बँकेचे चेअरमन आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी स्वीकारला
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन च्या वतीने देण्यात येणारा मानाचा कै.वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार-2022′ मराठवाडा विभागात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शनिवारी नाशिक येथे भारताचे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते शानदार सोहळयात लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी स्वीकारला असून लातूर जिल्हा बँकेला मिळालेल्या पुरस्काराने लातूर बँकेचा सहकार पॅटर्न मध्ये मानाचा तुरा रोवला असून बँकेची सहकार क्षेत्रात दैदीप्यमान वाटचाल सूरू आहे नाशिक येथे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन च्या वतीने शनिवारी देण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्याला भारताचे माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे, अरविंद पोरेडीवार एम.एस. सी. बी. ए. चे अध्यक्ष विश्वास ठाकूर ,उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, अजय ब्रम्हेचा, शशिताई अहिरे आदि मान्यवर उपस्थित होते या पुरस्कार सोहळ्याला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार धिरज विलासराव देशमुख ,उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, संचालक पृथ्वीराज शिरसाठ,राजकुमार पाटील, दिलीप पाटील नागराळकर, अनुप शेळके, व्यंकटराव बिरादार, मारोती पांडे, भगवानराव पाटील तळेगावकर, संचालिका सौ स्वयं प्रभा पाटील, श्रीमती लक्ष्मीबाई भोसले, सौ सपना कीसवे, सौ अनिता केंद्रे, बँकेचे कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव उपस्थित होते.
जिल्हा बँकेला मिळालेला पुरस्कार केलेल्या कार्याची पावती बँकेचे अध्यक्ष आमदार धिरज देशमुख यांची माहिती
शेतकरी व सर्वसामान्यांचे हित समोर ठेवून नेत्रदीपक वाटचाल करणाऱ्या लातूर जिल्हा बँकेच्या कार्याची दखल घेवून बँकिंग क्षेत्रात अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल असोसिएशनचे आणि पुरस्कार निवड समितीचे प्रथमतः आभार. हा पुरस्कार म्हणजे लातूर जिल्हा बँकेशी जोडले गेलेल्या सर्व घटकांनी एकजुटीने व एका विचाराने केलेल्या कामाची पावती आहे असे बँकेचे चेअरमन आमदार धिरज देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले गांधीवादी विचारवंत तथा महाराष्ट्राचे पहिले अर्थ आणि सहकार मंत्री वैकुंठभाई मेहता यांनी सहकारी चळवळीत निरपेक्षपणे आयुष्यभर काम करून सहकाराला योग्य दिशा द्यायची भूमिका घेतली. त्यांच्यासह दूरदृष्टी लाभलेल्या अनेक नेत्यांमुळे सहकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. म्हणूनच वैकुंठभाईंच्या नावाचा हा पुरस्कार आम्हाला नवी प्रेरणा, नवे बळ देणारा आहे.तसेच लोकनेते, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या आशीर्वादाने, सहकारमहर्षी तथा माजी मंत्री आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, माजी पालकमंत्री मा. अमित विलासराव देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्हा बँकेची देदीप्यमान वाटचाल सुरू आहे. यापुढेही ती अशीच पुढे सुरू राहील, अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली.