‘जी-२०’ समूहाच्या दोन दिवसांच्या शिखर परिषदेला आज ( ९ सप्टेंबर ) सुरूवात होत आहे. या बैठकीत ४० हून अधिक राष्ट्रप्रमुख दाखल झाले आहेत. जी-२० परिषदेनिमित्त नवी दिल्ली उपस्थित असलेल्या सर्व राष्ट्रमुखांसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे. पण, डिनरला काँग्रसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना निमंत्रित करण्यात आलं नाही. यावरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं जात आहे.कर्नाटकातील कलबुर्गी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना,मल्लिकार्जुन खरगे यांनीही मोदी सरकारला सुनावलं आहे. “मी आणि काँग्रेस पक्षाकडूनही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. हे चांगलं राजकारण नाही. केंद्र सरकारने खालच्या दर्जाचं राजकारण करू नये,” असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं.काँग्रेस नेते, राहुल गांधी यांनीही बेल्जियमधून मोदी सरकारवर टीका केली आहे. “६० टक्के लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या विरोधी पक्षांना सरकार महत्व देत नाही. याचा हा पुरावा आहे,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
“विरोधी पक्षाचा द्वेष करत आहात.”याप्रकरणावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “राजाचे मन छोटे असेल, तर असं होतं. माजी पंतप्रधान देवगौडा आणि माजी pm MANMOHAN SINGH यांना डिनरचं निमंत्रण देण्यात आलं आहे. ते प्रकृतीमुळे येऊ शकत नाहीत. पण, देशाच्या विरोधी पक्षाचे नेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आहेत. तुम्ही त्यांना बोलावत नाही, यावरून तुमच्या मनात भीती असल्याचं स्पष्ट होते. राज्यकर्त्यांचं मन मोठे असावे लागते. तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांचा द्वेष करत आहात, हे चुकीचं आहे,” असं संजय राऊत म्हणाले.