माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी नागरिकांच्या घेतल्या भेटी
लातूर (प्रतिनिधी):३राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज शुक्रवार दि. ८ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्याभेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन निवेदनाचा स्वीकार करून संबंधितांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या. यावेळी विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन रवींद्र काळे,
ट्वेंटीवन शुगरचे व्हा. चेअरमन विजय देशमुख, विजयकुमार साबदे, डॉ. अरविंद भातंब्रे, चक्रधर शेळके, लातूर अर्बन बँकेचे कार्यकारी संचालक वाय.एस.मशायक, डॉ.अजीम मशायक, अमित काझी, बाभळगावचे उपसरपंच गोविंद देशमुख, सय्यद नैमुद्दीन, नंदकुमार देशमुख, अमित शेळके, राजीव वंगवाड, अखिल अरब, आयुब शेख, आयुब पठाण, रफुद्दीन काझी, योगेश मुळे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते