माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत, सर्वाधिक ऊस पुरवठादार शेतकरी दांपत्याच्या हस्ते ऊस मोळीचे पूजन करून ट्वेंटीवन शुगर लिमिटेड युनीट १ च्या गळीत हंगामाचा शुभारंभ
लातूर प्रतिनिधी :-राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी दुपारी शेतकरी दांपत्याच्या हस्ते ऊस मोळीचे पूजन करून मळवटी येथील ट्वेंटीवन शुगर लि च्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. मंगळवार दि. १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता माजी मंत्री आमदार तथा कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम पार पडला, प्रारंभी सर्वाधिक ऊस पुरवठा करणारे श्री व सौ सुरेश बाबासाहेब पाटील या शेतकरी दांपत्याच्या हस्ते गळीत ऊस मोळीचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी अधिकाधिक कार्यक्षमतेने कारखाना चालवून परिसरातील शेतकऱ्यांच्या उसाचे वेळेत गाळप करावे, अशा सूचना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी देऊन, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, कामगार या सर्वांना गळीत हंगामाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.ट्वेंटीवन शुगर लिमिटेडचे व्हाईस प्रेसिडेंट समीर सलगर, विपिन देशमुख, अनिल मैंदरकर, गोविंद देशमुख, शेतकी अधिकारी सुभाष कल्याणकर, मुख्य शेतकी अधिकारी मिलिंद पाटील, माजी नगरसेवक रविशंकर जाधव, पुनीत, पाटील सचिन बंडापले, संभाजी सुळ, जगदीश बावणे, अनिल पाटील, हणमंत पवार, ऊस उत्पादक शेतकरी, ट्वेंटीवन शुगर लिमिटेडचे अधिकारी, कर्मचारी तसेच ऊस उत्पादन शेतकरी यावेळी उपस्थित होते.