कासार सिरसी परिसराचा तालुका निलंगा, आमदार औशाचा तर खासदार उस्मानाबादचा ः प्रा.सुदर्शनराव बिरादार
कासार सिरसी (प्रतिनिधी)ः कासार सिरसी परिसरातील 68 गावांचा कारभारच मोठा वेगळा आहे. ज्या गावाला कधी जात नाहीत तिथला आमचा आमदार आहे. ज्या जिल्ह्याचा कधीही संपर्क होत नाही तिथला आमचा खासदार आहे. म्हणजे आमचा तालुका निलंगा, आमदार औशाचा तर खासदार उस्मानाबादचा अन् संस्कृती कर्नाटकशी जुळती असल्याचे प्रतिपादन लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी लिंगायत समाजाच्या करीबसवेश्वर मठात रविवारी झालेल्या मेळाव्यात बोलताना केले.
लिंगायत महासंघाच्यावतीने कासार सिरसी परिसिरातील 68 गावातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा रविवार दि.3 सप्टेंबर 2023 रोजी करीबसवेश्वर मठ कासार सिरसी येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना ते म्हणाले की, लिंगायत समाजाने राजकारणाची दिशा ओळखावी. एकेकाळी लिंगायत समाजाचे 22 अमादार महाराष्ट्रात होते. आता त्याची संख्या एक-दोनवर आली आहे. या पडझाडीला जबाबदार कोण? लातूर जिल्ह्यात 8 लाख लिंगायत मतदार आहेत. आपल्या हिश्याला दोन ते तीन आमदार येतात. पण लिंगायत पुढार्याच्या चुकीच्या वागण्यामुळे आज जिल्ह्यात एकही आमदार नाही. यापुढे समाजाने एकजुटीने काम करून राज्यकर्त्यांकडून समाजाचे प्रश्न सोडवून घ्यावेत. कोणत्याही राजकीय पुढार्याच्या नादी न लागता स्वबळावर समाज घडवूया. राजकीय पक्षाने आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थेत तिकीट नाही दिल्यास लिंगायत महासंघ स्वतः समाजाचे उमेदवार उभे करेल असे यावेळी सुदर्शनराव बिरादार म्हणाले. निलंगा येथील अनुभवमंटपाच्या महिलांच्यावतीने सौ.संगिता भुसनुरे व सौ.वैशाली व्हनाळे यांच्या पुढाकाराने इष्टलिंग पुजा करण्यात आली. यावेळी कोराळी, कासार सिरसी, शिराढोण, हल्लाळी, हासली, उस्तुरी येथील महिलांनी इष्टलिंग पुजेत सहभाग घेतला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवकुमार (काका) चिंचनसुरे हे होते. कार्यक्रमाचे संयोजक करीबसवेश्वर पाटील यांच्यासह कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद जिल्हा लिंगायत महासंघाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव पाटील गुंजूटीकर, महात्मा बसवेश्वर देवस्थान कमिटी बसवकल्याणचे अध्यक्ष जगन्नाथ खुब्बा, लिंगायत महासंघाचे लातूर जिल्हा संघटक काशीनाथ मोरखंडे, लातूर शहराध्यक्ष प्रा.वैजनाथ मलशेट्टे, निलंगा तालुकाध्यक्ष चंद्रकांत डांगे, सरचिटणीस अशोक काडादी, प्रा.विठ्ठल आवाळे, प्राचार्य ओमप्रकाशन भुसनूरे, जी.जी.ब्रम्हवाले, तानाजी पाटील भडीकर, लातूर तालुकाध्यक्ष भिमाशंकर ढेकणे, विश्वनाथप्पा मिटकरी, चाकूर तालुकाध्यक्ष सुभाष शंकरे, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष निळकंठ शिवणे, पंचायत समिती सदस्या सौ.गोकर्णाताई पाटील, तानाजी डोके, अमर मुगावे, देवणी तालुकाध्यक्ष शेषेराव मानकरी, शहराध्यक्ष विजयकुमार लुल्ले, चंद्रकांत तोळमारे, एस.एस.बिराजदार ममदापूर, सोमनाथ स्वामी डिघोळकर, सुर्यकांत पत्रे, परमेश्वर कठाळे, रामेश्वर चेंगटे, इंजि.भुसनूरे, नागपण्णा होळकुंदे, गिरीष चिंचनसुरे, दयानंदअप्पा बोळशेट्टे, संतोष स्वामी, शिंगारे अप्पा, सौ.डिगे ताई, करबसअप्पा होळकूंदे, काजारे अप्पा आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच एन.आर. स्वामी, एम.एम.बिरादार, नागनाथप्पा निला, अप्पासाहेब बिरादार, सौ.राजश्री खुब्बा, शेषेराव मानकरी आदिंची भाषणे झाली. यावेळी हालसी गावच्या सरपंच सौ.महानंदा बिरादार, चेअरमन दत्तात्रय बिराजदार, रामलिंग मुदगडचे उपसरपंच नंदकुमार पाटील, कासार बालकुंदा, बडुर, तांबाळा, ममदापुर, हल्लाळी, शिराढोण, मिरगाळी, कोकळगाव, नदीहत्तरगा, चिंचोली सायखान, भंगार चिंचोली येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिंगायत महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष करीबसवेश्वर पाटील, तालुकाध्यक्ष चंदक्रांत डांगे, एन.आर.स्वामी, अशोक काडादी, इंजि.भुसनूरे, सौ.संगीता भुसनूरे, सौ.वैशाली व्हनाळे, विलास व्हनाळे, बस्वराज बसपूरे आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.एम.बिरादार यांनी केले तर सुत्रसंचलन किशन कोलते यांनी तर आभार प्रा.वैजनाथ मलशेट्टे यांनी मानले.
कासार सिरसी परिसराचा तालुका निलंगा, आमदार औशाचा तर खासदार उस्मानाबादचा- प्रा.सुदर्शनराव बिरादार
