• Tue. Apr 29th, 2025

शहीद टिपू सुलतान संघटनेतर्फे सोमवारी धरणे आंदोलन

Byjantaadmin

Sep 1, 2023
शहीद टिपू सुलतान संघटनेतर्फे सोमवारी धरणे आंदोलन
निलंगा प्रतिनिधी : लातूर जिल्हात्यात पाऊस नसल्याने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी,नगर पालिकेने बंद केलेले बोर तात्काळ सुरु करण्यात यावे  शहरातील अनेक भागात पाणी येतच नाही,  ज्या भागात  नळाच्या पाण्याला दबाव नाही त्या त्रुटी तात्काळ दुरुस्त करण्यात यावया,100 कोटीची पाणी योजना 24 तास पाणी पुरवठा,अगदी दुसऱ्या मजल्यावरही पाणी बिना मोटरीच येईल म्हणून बोगस,भ्रष्ट काम  करुन् अग्रीमेंट संपलं म्हणून काम अर्धवट करून पळून गेलरल्या गुत्तेदाराची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा, शहरातील गल्ली बोलातील रस्तात्यावरील खड्डे निदान बुजवण्यात याव्या,जुन्या गावात औरंगपुरा,जाम्बाग ,छोटी मस्जिद,हैदरिया नगर,काजी गल्ली,खिंडी गल्ली,माळी गल्ली,पेठ, जुने पोलीस स्टेशन ते पिरपाशा दर्गा या भागातील रस्ते तात्काळ करण्यात यावे,
शहरातील व गल्ली बोलतील बंद असलेले पथ दिवे, हायमॅक्स तात्काळ चालू करण्यात यावे,
शहरात डासांचे प्रमाण वाढलायाने नाल्यांची स्वछता व धुर फवारणी करण्यात यावी अशा मागण्यासाठी शहीद टिपू सुलतान संघटनेतर्फे उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी शोभा जाधव व पोलीस निरिक्षक शेजाळ यांना देण्यात आले आहे
     सदरील निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर,तालुका अध्यक्ष सबदर काद्री,शहराध्यक्ष बाबा बिबराले, सोहेल खदिम,अकबर खडके,मैनोद्दीन मणियार फेरोज सय्यद्,महेमूद महम्मद् शेख, आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed