अजित पवार यांना भाजपाने महायुतीत सहभागी करून घेतले. त्यांच्या येण्यामुळे आमचा फायदाच होणार असला तरी अजित पवारांनंतर आणखी कोणाला सोबत घेऊ नका असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले. रोजगार मेळाव्यासाठी नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
राजीनामा देऊन राहुल गांधींचा पळपुटेपणा
राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नको होता. देशात चांगले काम करतील तेव्हा लोक त्यांच्या पक्षाला संधी देणारच आहे असे आठवले म्हणाले. राजीनामा देऊन राहुल गांधींनी पळपुटे पणा करायला नको होता. इंडियात पंतप्रधान होण्यासाठी चढाओढ आहे. महाराष्ट्रात उद्वव ठाकरे, शरद पवार इच्छुक आहे. जितके पक्ष तितके उमेदवार त्यांच्यात आहे. एनडीएत असे नाही असे ते म्हणाले. विरोधकांनी इंडिया नाव द्यायला नको होते. त्याला माझा विरोध आहे.
दलित युवकांना मारहाण, मी भेट देणार
शिर्डी जवळ चार दलित मुलांना मारहाणीची घटना दुर्दैवी आहे. मी एक तारखेला तिथे भेट देणार आहो. यामधील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेउन करणार आहे. आमचे सरकार मालगाडी असल्याची टीका उध्दव ठाकरे यांनी केली आहे. त्यांना आमदार सांभाळता आले नाही म्हणूण ते चिडले आहे. नैराशातून त्यांनी टीका केली आहे. त्यांनी टीका करावी. पण खालच्या स्तरावर कोणावर टिका करू नये असे ते म्हणाले.
वंचित सोडून प्रकाश आंबेडकरांनी रिपाईत यावे
बाबासाहेबांचे स्वप्न साकार करायचे असेल तर वंचित सोडून प्रकाश आंबेडकरांनी आरपीआयमध्ये यावे. बरेचजण वंचित सोडून आरपीआयमध्ये येत आहे. डॉ. राजेंद्र गवई आमच्यासोबत येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. महाविकास आघाडीमध्ये राहून काही उपयोग नाही असे आठवले म्हणाले. बीआरएसला महाराष्ट्रात काही भविष्य नाही. म्हणून चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात वेळ वाया घालवू नये असे ते म्हणाले.