उद्धव ठाकरे यांना कधी नातं टिकवताच आलं नाही. त्यामुळे या नात्यावर आणि पवित्र बंधनावर ते बोलत असतात. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच मिटले असते. ते एकत्र आले असले. पण त्यावर उद्धव ठाकरेंनी कधीच निर्णय घेतला नाही, असा गंभीर आरोप खासदार भावना गवळी यांनी केला आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कालच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांनाच राज ठाकरे यांच्याशी जुळवून घ्यायचे नव्हते हेच खासदार भावना गवळी यांनी अधोरेखित केले आहे.
या संदर्भात खासदार भावना गवळी म्हणाल्या की, साहेब तुम्ही कधीच कुणाला चांगली वागणूक दिली नाही. आम्ही 13 खासदार का गेलो? याचे चिंतनही तुम्ही केले नाही. तुमच्या पक्षाचे 40 ते 50 आमदार शिंदे यांच्यासोबत का जातात? याचंही चिंतन उद्धव ठाकरे यांनी केले नसल्याचे त्या म्हणाल्या.
तुम्ही कधी बंधन पाळले नाही
भावना गवळी म्हणाल्या की, माझ्यासारखी कर्तृत्वान महिला शिवसेनेत पाचवेळा निवडून आली. माझ्या मतदारसंघात मी गेल्या 24 वर्षापासून रक्षा बंधनाचा कार्यक्रम राबवते. मी वाजपेयींना राखी बांधली तसेच मोदींना देखील मी राखी बांधली आहे. त्यामुळे या बंधनावर तुम्ही बोलू नये. तुम्ही कधी बंधन पाळले नसल्यानेच आजची परिस्थिती निर्माण झाली असाल्याचा गंभीर आरोप भावना गवळी यांनी केला आहे.