• Thu. Jun 19th, 2025

अमित शहांच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गुजरातला रवाना

Byjantaadmin

Aug 28, 2023

राज्यातील राजकारणावर चर्चा करण्यासाठी राज्यातील नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या वाढलेल्या आहेत. मात्र, आता त्यात गुजरातचाही समावेश झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुजरातसाठी रवाना झाले आहेत. अमित शहा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत हे दोघे सहभागी होणार आहे.

 

राज्याच्या राजकीय वर्तुळातील एक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुजरातला रवाना झाले असून त्यांच्या पाठोपाठ आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील गुजरातला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री परभणी दौऱ्यावर होते. त्या नंतर लगेचच ते गुजरातसाठी रवाना झाले. या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. तसेच विविध विषयांवर सविस्तर चर्चा करणार आहे. या भेटीमागचे खरे कारण मात्र, गुलदस्त्यात आहे.

क्षेत्रीय परिषदेचे आयोजन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली गुजरातच्या गांधीनगरमध्ये क्षेत्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार आहेत. या बैठकीमध्ये शेजारी राज्यात परस्पर सहगोग निर्माण करण्याविषयी चर्चा होणार आहे. त्यामुळे यात महाराष्ट्रासह इतर राज्यातील प्रतिनिधी देखील सहभागी होतील. या बैठकीत अनेक प्रश्नांवर चर्चा होऊन ते मार्गी लागतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *