• Thu. Jun 19th, 2025

लातूर शहर जिल्हा महिला काँग्रेसकडून शहरातील प्रभाग ३ मधील महिलांशी सुसंवाद

Byjantaadmin

Aug 28, 2023

लातूर शहर जिल्हा महिला काँग्रेसकडून शहरातील प्रभाग ३ मधील महिलांशी सुसंवाद

लातूर –   स्थानिक स्वराज्य संस्थेत सध्या लोकप्रतिनिधी नाहीत लातूर महानगरपालिकेत देखील प्रशासक आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची कामे खोळंबली आहेत. या अनुषंगाने लातूर शहरातील महिलांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर शहर जिल्हा महिला काँग्रेसची लातूर शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील संत गोरोबा सोसायटी येथील माजी नगरसेविका वर्षा मस्के यांच्या निवासस्थानी सुसंवाद बैठक संपन्न झाली.
यावेळी प्रभागातील पाणीपुरवठा, साफसफाई, घंटागाडी, पथदीवे या बाबतची परिस्थिती माहीती करून घेतली. तसेच येथील महिला गृहिणींनी वाढती महागाई, महिलांवरील वाढते अत्याचार, निराधारांचे प्रश्न, बेरोजगारी यासारखे प्रश्न सध्याचे देशातील व राज्यातील भाजप सरकार सोडवत नाही, त्यामुळे काँग्रेस शिवाय आता पर्याय नाही अशा भावना सामान्य लातूरकर व्यक्त करीत असल्याचे दिसून आहे. याप्रसंगी लातूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रथम महापौर प्रा. डॉ. स्मिता खानापुरे, माजी नगरसेविका वर्षा मस्के, प्रभाग क्रमांक ३ महिला काँग्रेसच्या अध्यक्षा तनुजा कांबळे, लक्ष्मण मस्के, वंदना लक्ष्मण मस्के, रजनीगंधा अभिजीत कांबळे, विमलबाई ज्ञानोबा कांबळे, सुमन सतीश वाघमारे, रेशमा मारुती गवारे, आशा कांबळे, प्रभावती रवींद्र गायकवाड, नागनाथ अभाजी कांबळे, भारतबाई भगवान वाघमारे, मंगलबाई दगडू संमुखराव, माया सिताराम पवार, जयश्री नवनाथ जाधव, जयश्री नवनाथ जाधव, आरोही शंभू संमुखराव, गंगुबाई विश्वनाथ शिंदे, पूजा अमोल कदम, संगीता शामवाघमारे, ज्योती ज्ञानेश्वर कदम, रेखा घोडके, दिव्या सुनील कांबळे,
सुजाता बाबुराव कांबळे, माया विनोद कांबळे, स्वाती परमेश्वर कांबळे, छाया विश्वास हणमंते, राणी विश्वनाथ चव्हाण, वंदना लक्ष्मण मस्के, शितल मुकेश पवार, वनिता लखन पवार, स्वाती राजेश पवार, अनिता वामन आरडागळे, वंदना कांबळे, उत्तम कसबे आदीसह लातूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या प्रभाग क्रमांक ३ मधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *