दुष्काळी अनुदान जाहीर करावा व कांद्यावरील जाचक निर्यात कर रद्द करावा निलंगा राष्ट्रवादीचे निवेदन
निलंगा- सतत मागील 30 दिवसापासुन पावसाने दडी दिल्यामुळे सोयाबीन सह ईतर पिके कोमेजुन,वाळुन गेली आहेत व शेतकरी वर्गाचे पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे यासंबंधी विमा कंपनी व शासनास कळवुन तात्काळ हेक्टरी सरसकट 2 लाख रुपयाची मदत शासनाने जाहीर करावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निलंगा यांच्यावतीने उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.तसेच कांद्यावरील जाचक 40% निर्यात कर तात्काळ रद्द करावा अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष सुधीरदादा मसलगे,शहराध्यक्ष ईस्माईल लदाफ,जिल्हा उपाध्यक्ष अंगद जाधव,सुरेश रोळे,ईफरोज शेख,युवकचे सुग्रीव सुर्यवंशी,निजाम शेख सय्यद काद्री, लिगल सेल चे अँड.गोपाळ इंगळे,किसन सुर्यवंशी,अलिबाबा चौधरी,विलास माने,नसीम तांबोळी,सलीम पठाण व ईतर कार्यकर्ता व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.