• Sat. Aug 16th, 2025

मी NDAमध्ये जाणार म्हणणारे मुर्खाच्या नंदनवनात:शरद पवारांचा भाजप नेत्यांवर हल्लाबोल

Byjantaadmin

Aug 26, 2023

भाजप्रणीत एनडीएमध्ये सहभागी व्हावे, अशा पद्धतीने शरद पवारांची वाटचाल सुरू आहे, असे वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. त्यावर असे वक्तव्य करणारे मुर्खाच्या नंदनवनात राहतात, असे जोरदार प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिले आहे.

पातळी किती घसरली?, हे दिसते

शरद पवार सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. येथे पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, मी भाजपसोबत जाणार, असे खुळचटपणाचे वक्तव्य काही पक्षाचे नेतृत्व अलेल्या नेत्यांकडूनच केले जात आहे. मला त्यांना सांगायचे आहे की, ते मुर्खांच्या नंदनवनात राहतात. त्यांचे वक्तव्य अत्यंत खुळचटपणाचे आहे. मी भाजपसोबत जाणार, असे वक्तव्य करून या पक्षाच्या नेतृत्वाची पातळी किती घसरली, हे लक्षात येते.

बावनकुळे, मुनगंटीवारांनी केला होता दावा

मागील नऊ वर्षांच्या कार्यकाळात तसेच पुढील एक वर्षात केंद्र सरकारकडून जी धडाडीने कामे होणार आहेत, ती बघता राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेही मोदींचे नेतृत्व मान्य करून भाजपसोबत येतील, असे भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी अमरावतीमध्ये केले. तसेच, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही शरद पवारांची वाटचाल ही एनडीएकडे सुरू असल्याचे म्हटले होते. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्याचा शरद पवारांनी आज खरपूस समाचार घेतला.

1 सप्टेंबरला इंडियाची बैठक

शरद पवार म्हणाले, मी देशातील स्थिती लोकांसमोर मांडण्यासाठी दौरे करत आहे. भाजप सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे भाजपचा पराभव करण्यासाठी व येत्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनिती आखण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक 1 सप्टेंबररोजी मुंबईत होत आहे. या बैठकील तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान, झारखंड, पंजाब, दिल्ली, पश्चि बंगाल, कर्नाटक या राज्याचे मुख्यमंत्री हजर असतील. देशातील 16 राजकीय पक्षांचे अध्यक्ष बैठकीला राहतील. काँग्रेसकडून मल्लिकार्जून खर्गे, राष्ट्रवादीकडून मी, शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आदी नेते या बैठकीला हजर राहणार आहेत.

लोकसभा निवडणूक एकत्र लढवणार?

शरद पवार म्हणाले, लोकसभा निवडणूक एकत्रपणे लढणे शक्य आहे का? यावर इंडिया आघाडीच्या बैठकीच चर्चा होईल. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना ते सामुदायिकपणे, एकत्रितपणे कसे जाता येईल? यासंबंधीच्या शक्यता पडताळून पाहिल्या जातील. तसेच, भाजपचा पराभव करण्यासाठी काय रणनिती असावी, यावरही चर्चा केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *