• Sat. Aug 16th, 2025

अनधिकृत वजन काटे न वापरण्याचे आवाहन

Byjantaadmin

Aug 26, 2023

अनधिकृत वजन काटे न वापरण्याचे आवाहन

लातूर(जिमाका): शेजारच्‍या राज्यांतून वजन काट्याचे सुट्टे भाग व वजन काटे कमी दरात व कररहीत स्‍वरुपात महाराष्ट्रात विकले जात असल्‍याने स्‍थानिक वजन काटे उत्‍पादक, दुरुस्‍तक व विक्रेते यांचे नुकसान होत आहे. तसेच राज्य शासनाचा महसूल बुडत आहे. या अनुषंगाने राज्याचे वैध मापन शास्त्र नियंत्रक यांच्याकडे तक्रार प्राप्त झाली आहे. तसेच चीन मधून येणाऱ्या अप्रमाणित वजन काट्यांची सुद्धा कमी दरात खुल्या बाजारात विक्री होत आहे. या अप्रमाणित वजन काट्यांमुळे ग्राहकांच्या हिताची हानी होत असल्याने जिल्ह्यात कोणीही अनधिकृत वजन काटे वापरू नयेत, असे आवाहन लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याचे वैध मापन शास्त्र उप नियंत्रक यांनी केले आहे.

चीन मधून येणाऱ्या अप्रमाणित वजन काट्यांना राज्‍य शासनाची व केंद्र शासनाची वैधानिक मान्‍यता नाही. अशा वजन काट्यांना अनाधिकृत व्‍यक्‍ती त्‍यांचे स्टिकर लावून त्‍याची अनधिकृत विक्री करीत आहे. यामुळे ग्राहकांना माल योग्‍य वजनात मिळू शकत नाही. तसेच महाराष्‍ट्र शासनाचे महसुलावर परिणाम होत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्‍या अनाधिकृत व्यक्तींकडून वजन काटे खरेदी करू नयेत, असे आवाहन लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याचे वैध मापन शास्त्र उप नियंत्रक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *