माहेश्र्वरी विद्या प्रचारक मंडळाच्या रक्तदान शिबिरास लातुरात उत्स्फूर्त प्रतिसाद 301 दात्यांचे रक्तदान
लातूर`लातूर शहरात एमव्हीपीएम छात्रालय माजी विद्यार्थी संघटना, दयानंद शिक्षण संस्था व इतर सामजिक संस्थांच्या वतीने दोन दिवसीय भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास लातूरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
एमव्हीपीएम छात्रालय माजी विद्यार्थी संघटना आणि माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रभर रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचा एक भाग म्हणुन लातुरात शनिवारी दयानंद शिक्षण संस्था व रविवारी कृष्णकुमार लाहोटी सभागृह, लाहोटी कंपाऊंड येथे असे दोन दिवस रक्तदान शिबिर घेण्यात आले. एमव्हीपीएम छात्रालय माजी विद्यार्थी संघटना यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास लातूर जिल्हा माहेश्वरी, इनरव्हील क्लब, चार्टर नंबर 3261, रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन, समर्पण फाउंडेशन, लायन्स क्लब ऑफ लातूर सिटी आणि रॉबिन हुड आर्मी यांच्यासह इतर सामाजिक संस्थांनी सहकार्य केले असून या शिबिरात एकूण 301 दात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मिरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी एमव्हीपीएम छात्रालय माजी विद्यार्थी संघटनेच्या रिजनल डायरेक्टर निकेता भार्गव, प्रोजेक्ट चेअरमन चैतन्य भार्गव, रमण मालू, श्रेयस मालपाणी, शैलेश कलंत्री, वैभव गिल्डा, नितिन भराडिया, शीतल गिल्डा, शिल्पा बियानी , नंदकुमार चांडक, माहेश्वरी सभेचे अध्यक्ष सीए प्रकाश कासट, नंदकुमार लोया, अभिषेक मुंदडा, केतन बजाज, किरण तापडिया, मंगल लद्दा, समर्पण फाउंडेशनचे राजेश मित्तल, लायन्स क्लबचे डॉ शांतीलाल शर्मा, रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे श्रीप्रकाश बियाणी, इनरव्हील क्लबच्या मेघा अग्रोया, रॉबिन हुड आर्मीच्या ऊर्वी नागुरे आदिंनी सहकार्य केले.