पानचिंचोली येथे अश्वगंधा लागवडचा शुभारंभ वनऔषधी व सुगंधी वनस्पती लागवड योजनेत लातूर जिल्हयातील शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा सौ. अदिती अमित देशमुख
लातूर (प्रतिनिधी):ट्वेन्टीवन ॲग्री लि.,आंतरराष्ट्रीय आयुर्वेदीक कंपनीच्या भागीदारीतून सेंद्रीय शेती आणि सुगंधी औषधी वनस्पती लागवड योजना गतवर्षी प्रमाणे याही वर्षी राबवीत आहे. या योजनेअंतर्गत या हंगामातील अश्वगंधा लागवडीचा शुभारंभ ट्वेंटीवन ॲग्री ली.,च्या संचालिका सौ. आदिती अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावर्षीच्या हंगामात २५० एकरवर क्षेत्रावर अश्वगंधा लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना अश्वगंधा लागवड ते काढणी पर्यंतचे तज्ज्ञाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच अश्वगंधा खेरदीची हमी देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होणार असल्याने योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात त्यांनी केले आहे. ट्वेन्टीवन ॲग्री लि.,च्या या हंगामातील अश्वगंधा लागवडचा शुभारंभ ट्वेंटीवन ॲग्री ली.,च्या संचालिका सौ. आदिती अमित देशमुख यांच्या हस्ते पानचिंचोली येथील अविनाश ज्ञानोबा काळे यांच्या शेतामध्ये करण्यात आला आहे.
यावेळी बोलतांना ट्वेंटीवन ॲग्री ली., च्या संचालिका सौ.आदिती अमित देशमुख म्हणाल्या ट्वेन्टीवन ॲग्री लि., व आंतरराष्ट्रीय आयुर्वेदीक कंपनीच्या भागीदारीतून गत दोन वर्षापासून अश्वगंधा लागवड योजना राबविण्यात आली, या योजनेत महाराणा प्रताप नगर, मळवटी, महापूर, हरंगुळ बु., हरंगुळ खु., चिखुर्डा, आखरवाई, गातेगाव, मांजरी, सारोळा, कव्हा, जमालपूर येथील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. या शेतकऱ्यांना अश्वगंधा लागवड ते काढणी पर्यंतचे तज्ज्ञानी मार्गदर्शन केले, अश्वगंधा खेरदीची हमी देण्यात आल्याने या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला आहे. येत्या हंगामामध्ये अश्वगंधा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अश्वगंधाच्या उत्पन्नाला खरेदी करतांना भाव वाढवून दिला जाणार आहे असे सांगीतले. तसेच शेतकऱ्यांच्या अश्वगंधाचा पालाही खरेदी केला जाईल असे संचालिका सौ. आदिती अमित देशमुख यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगीतले. यावर्षीच्या अश्वगंधा लागवड मोहिमेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा असेही त्यांनी आवाहन केले. या संदर्भातील अधिक माहितीसाठी ट्वेंटीवन ॲग्री
कार्यालया, एकमत चौक, पीव्हीआर टॉकीजच्या समोर भेट द्यावी किंवा खालील दिलेल्या नंबर वरती संपर्क साधावा 9260000083, 9604300021 असे सांगीतले.
यावेळी कार्यक्रमास संगीता मोळवणे, धनंजय राऊत, अविनाश कळसे, लहू जाधव, विष्णू चौधरी, संदीप कांबळे, अविनाश कांबळे, गणेश नाईक, राहुल कळसे व गावातील शेतकरी उपस्थित होते.