दिल्लीत सप्टेंबर महिन्यात जी 20 परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने तीन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. पुढील महिन्यात 8, 9 आणि 10 सप्टेंबरला ही महत्त्वपूर्ण बैठक असल्याने या परिषदेसाठी जवळपास 25 पेक्षा जास्त देशांचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष येणार आहेत. या पार्श्वभूमीवरच दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेत 8, 9 आणि 10 सप्टेंबरला दिल्ली बंद ठेवण्यात येणार आहे.जी 20 परिषदेची बैठक असल्याने या तीन दिवसांतDELHI SARKAR ची प्रशासकीय कार्यालये, दिल्ली महापालिकेची सर्व कार्यालय तसेच सर्व शाळा आणि महाविद्यालयांना देखील तीन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 25 पेक्षा जास्त देशांचेPM आणि राष्ट्राध्यक्ष दिल्लीत येणार असल्याने त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव या तीन दिवसांच्या सुट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे.
या तीन दिवसांच्या कालावधीत दिल्लीतील BUS CLOSED असणार आहे. याबरोबरच दिल्लीतील सर्व खाजगी कंपन्यांची कार्यालये, दुकान, हॉटेल्स देखील बंद राहणार आहेत. तसेच या तीन दिवसांत सर्वसामान्य नागरिकांनाही दिल्लीत प्रवेश दिला जाणार नाही. मेट्रे स्टेशन देखील बंद राहणार असून या परिषदेच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच मोठी तयारी करण्यात आली आहे.जी 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर महिन्यात दिल्लीत मोठी ‘व्हीआयपी मुव्हमेंट’ असणार आहे. त्यामुळे 8 ते 10 सप्टेंबर या तीन दिवसाच्या काळात विविध ठिकाणच्या वाहतुकीत देखील बदल करण्यात येणार आहेत. या कालावधीत दिल्लीकरांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येण्याची शक्यता आहे.