• Tue. Aug 19th, 2025

तीन विद्यार्थींनीचा सन्मान-चिन्ह व बक्षिस वितरण सोहळा संपन्न

Byjantaadmin

Aug 21, 2023
76 व्या स्वातंञ्य दिनाचे औचित्य साधुन ;एस.एस.सी 1993-94 बॅचच्या वतीने शालांत परिक्षा-2023 च्या तीन विद्यार्थींनीचा सन्मान-चिन्ह व बक्षिस वितरण सोहळा संपन्न
निलंगा-(प्रतिनिधी)-निलंगा तालुक्यातील निटूर येथील एस.एस.सी 1993-94 बॅचची व्हाॅटसअप गुृृृपच्या माध्यमातून एकञ आल्याने या गुृृपला भविष्य प्राप्त झाल्याने एक स्तुत पाऊल टाकण्याचा विचार सर्वांच्या मनात रूजला आणि मैञी फाऊडेशन पुरूष  बचत गटाची स्थापना करून अनेक स्तुत्य उपक्रम साजरा करण्याचा संकल्प हाती घेण्यात आला त्यात एस.एस.सी 1993-94 बॅचच्या विद्यार्थ्यांनी ज्या जि.प.प्रशालेमध्ये दहावी पर्यंत धडे गिरवले म्हणून आपण शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी कायम तत्त्पर राहुन शालांत परिक्षेतील दहावीतील विद्यार्थींनीचा प्रथम, व्दितीय,तृतीय सन्मान-चिन्ह व बक्षिस वितरणाचा कार्यक्रम 76 व्या स्वातंञ्य दिनाचे औचित्य साधुन हा सोहळा जि.प.प्रशालेच्या प्रांगणावर संपन्न झाला.
     यात कु.सोमवंशी आरती दगडू 90.40 टक्केवारी घेऊन प्रथम क्रमांक (रू.2100/-सन्मान-चिन्ह), कु.माधवी मंगेश सावळे 88.20 टक्केवारी घेऊन व्दितीय क्रमांक(रू.1100/- सन्मान-चिन्ह),कु.साक्षी विरनाथ घोडके 88.00 टक्केवारी घेऊन तृृतीय क्रमांक( रू.551/- ) देवून त्यांचा यथोचित सन्मान-चिन्ह व बक्षिस देवून करण्यात आला.तसेच स्वातंञ्य दिनाचे औचित्य साधून उत्कृृष्ट भाषण केल्याबद्दल कु.पृृथ्वीराज तानाजी सोमवंशी याला रू.100/-  बक्षिस देण्यात आले. याप्रसंगी मैञी फाऊंडेशन पुरूष बचत गटाच्या वतीने जि.प.प्रशालेच्या शैक्षणिक सञातील विद्यार्थ्यांनी पुस्तक आणि मस्तकाची ओळख निर्माण करून भविष्यकाळात तुम्ही सर्व विद्यार्थी अभ्यासाकडे लक्ष देऊन गुण प्राप्त करून आमच्या गटाच्यावतीने सन्मान-चिन्ह व बक्षिस वितरण सोहळा स्विकारावा हा सोहळा यापुठे मोठ्या थाट्टात साजरा करून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम आम्ही करू असे गटाच्या सदस्यांनी सांगितले.
     याप्रसंगी मैञी फाऊंडेशन पुरूष बचत गटाचे सदस्य निळकंठ गंगणे,गणीपाशा शेख,पद्माकर निटूरे,धोंडीराम सोळुंके,जगन्नाथ बसवन्ने,शिवाजी अरेराव,दत्ता जगदाळे,सुग्रीव सुर्यवंशी,प्रशांत साळुंके तसेच जि.प.प्रशालेतील मुख्याध्यापक व शिक्षक-शिक्षकेत्तर,सेवक कर्मचारी,विद्यार्थी यांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *