• Tue. Aug 19th, 2025

लडाखमध्ये मोठी दुर्घटना, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळून ९ जवान शहीद

Byjantaadmin

Aug 20, 2023

केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये शनिवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनाचा मोठा अपघात झाला आहे. राजधानी लेहजवळील क्यारी गावातून जाणारं लष्कराचं एक वाहन दरीत कोसळलं आहे. या भीषण अपघातात भारतीय लष्कराच्या नऊ जवानांचा मृत्यू झाल्याचं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. नऊ जवान शहीद झाल्याची लष्कराने पुष्टी केली आहे, तर या अपघातात एक जवान जखमी झाला आहे. मृतांमध्ये आठ सैनिक आणि एक जेसीओ (ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर) यांचा समावेश आहे.

Indian Army Truck

भारतीय लष्कराशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या या वाहनाबरोबर एक रुग्णवाहिका आणि एक यूएसव्ही गाडीदेखील जात होती. या सर्व वाहनांमध्ये लष्कराचे एकूण ३४ जवान प्रवास करत होते. शनिवारी संध्याकाळी ६.३० वाजता लष्कराच्या ट्रकचा अपघात झाला. लष्करी वाहनं क्यारी शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर असताना हा अपघात झाला. लष्कराचं वाहन खोल दरीत कोसळलं. हे जवान कारू गॅरीसनहून लेहजवळच्या क्यारी शहराच्या दिशेने जात होते.हे गाव भारत आणि चीनच्या सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला (एलएसी) लागून आहे. दऱ्याखोऱ्यांचा आणि अवघड घाटांचा हा भाग रहदारीसाठी अवघड आहे. हा भाग एलएसीजवळ असल्याने येथे अत्यंत चोख सुरक्षा व्यवस्था आहे. भारतीय लष्कराच्या अनेक रेजिमेंट्स सध्या लेह भागात आहेत. सीमेवर चीनबरोबर सुरू असलेला तणाव लक्षात घेता या भागात सैनिकांची संख्या वाढवण्यात आली आहे.

संरक्षण मंत्री rajnath singh यांनी या अपघातानंतर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केलं आहे की लडाखमधील लेहजवळ झालेल्या अपघातात भारतीय सैन्यदलातील जवानांच्या मृत्यूच्या बातमीने मी दुःखी झालो आहे. या जवानांनी आपल्या भारतमातेची केलेली सेवा आम्ही कधीच विसरणार नाही. या बिकट परिस्थितीत मी शहीद जवानांच्या कुटुंबांबरोबर आहे. जखमी जवानांना फील्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. हे जवान लवकरात लवकर बरे होवोत अशी मी प्रार्थना करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *