• Sun. Aug 17th, 2025

दिल्लीत मोदी-शाहांच्या उपस्थित भाजपची खलबतं; पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर चर्चा

Byjantaadmin

Aug 17, 2023

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या निवडणूक समितीची बैठक दिल्लीत पार पडली. लवकरच या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.याच अनुषंगाने भाजप आतापासूनच कामाला लागली असून केंद्रीय निवडणूक समितीने दिल्लीत बैठक घेत भाजपच्या नेत्यांना काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी आणि अमित शाह देखील या बैठकीला उपस्थित होते.या पाच राज्यातील ज्या मतदारसंघात भाजपची ताकद कमी आहे, तेथे आणखी योजना आखण्यात येणार असून पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. याबरोबरच आगामीELECTION  या राज्यात कशी जिंकता येईल, याबाबतची रणनीतीही या बैठकीत ठरली असल्याचे सांगण्यात यते आहे. चार तास चाललेल्या या बैठकीत छत्तीसगड आणि MP च्या निवडणुकींवर फोकस करण्यात आल्याची माहिती आहे.

BJP Central Election Committee Meeting:

 

दुसरीकडे देशभरातील भाजपच्या तब्बल 350 आमदारांना 19 ऑगस्टला TRANIG दिले जाणार आहे. निवडणुकीच्या आधी सर्व्हे करण्यासाठी या आमदारांना ट्रेनिंग दिले जाणार आहे.bjpची रणनीती कशी ठरते, याबाबत या आमदारांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच ज्या राज्यात निवडणूक होणार आहे, त्या राज्यात इतर राज्यातील आमदार जाऊन सर्वे करणार असून याचा अहवाल वरिष्ठांना देणार आहेत. याबाबतची ही ट्रेनिंग भोपाळमध्ये होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *