• Sun. Aug 17th, 2025

पवारसाहेबांचा आदेश सिर आंखों पर!, आता परळीतील चित्र बदलणार; धनंजय मुंडेंच्या समर्थकाची शरद पवार यांना साथ

Byjantaadmin

Aug 17, 2023

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची बीडमध्ये आज जाहीर सभा होत आहे. यासभेत राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक बबन गित्ते हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. या प्रवेशाआधी त्यांनी परळी वैजनाथाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी निर्धार बोलून दाखवला. शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी मी आज हजारो समर्थकासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे, असं बबन गित्ते यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच बीडमध्ये आहेत. तिथे त्यांचं जंगी स्वागत केलं जात आहे. तसंच काही पक्षप्रवेशही या सभेत होणार आहेत.आगामी काळात विधानसभेसाठी शरद पवारसाहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे काम करणार. मुंडे बंधू-भगिनींनी पंचायत समितीच्या निवडणुकीत युती केली होती. मात्र आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणि शरद पवार साहेबांसाठी काम करणार आहे. आगामी निवडणुकीत पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे परळीचे चित्र बदलू शकतं, असं गित्ते म्हणाले आहेत.

बीडच्या शरद पवारांच्या सभेसाठी परळीतून 700 गाड्यांचा ताफा बीडच्या दिशेने रवाना झाला आहे. परळीतील जनक्रांती सेनेचे प्रमुख बबनराव गित्ते आज शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. बबनराव गित्ते हे आपल्या हजारो समर्थकासह आज राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. बबनराव गित्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कारण्यापूर्वी परळी वैजनाथाचे दर्शन घेऊन त्यांना साकडं घातलं आहे.परळीतील शरद पवार समर्थकांकडून बीडकडे जाताना बबन गित्ते यांचा सत्कार करण्यात आला. आज बीड येथील सभेमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत बबन गित्ते हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. बीड ला जाताना गित्ते यांचे शिरसाळा गावात जंगी स्वागत करण्यात आलं. मोठ्या संख्येने युवक यावेळी उपस्थित होते.

शरद पवार यांची आज बीडमध्ये सभा होतेय. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार पहिल्यांदा मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. धनंजय यांच्या होम ग्राऊंडवर पवारांची सभा होतेय. त्यामुळे या सभेत शरद पवार काय बोलणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *