निलंगा;- साई क्रिटिकेअर हॉस्पिटल निलंगा यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.डॉ. अरविंद भातांब्रे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले . स्व.आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या 11 व्या पुण्यतिथी निमित्त व स्वतंत्र दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर व औषधी मोफत
या शिबिराची सुरुवात स्व.विलासरावजी देशमुख साहेब यांच्या प्रतिमेच पूजन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली या वेळी उपस्थित निलंगा काँग्रेस चे तालुका अध्यक्ष विजयकुमार जी पाटील , माजी नगराध्यक्ष-हमीद भाई शेख, मा.सभापती अजित माने , जिल्हाध्यक्ष काँग्रेस प्रशिक्षण सेल चक्रधर शेळके, माजी सरपंच पंकज शेळके,माजी प.स.सदस्य महेश देशमुख व दयानंद चोपणे व आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरामध्ये 109 लोकांनी प्रतिसाद दिला. या शिबिरा मध्ये या तज्ञ डॉक्टराणी प्रथम उपचार केला ,डॉ.अरविंद भातांब्रे डॉ.राजशेखर मेनगुले डॉ. संदीप जाधव.यावेळी डॉक्टर अरविंद भातांब्रे म्हणाले की निलंगा तालुक्यातील जनतेला आरोग्याच्या समस्या पासून मुक्त करणे हे प्रथम माझे कर्तव्य आहे अनेकांना पैसे नसल्याने आरोग्य सुधारता येत नाही यामुळे तालुक्यातील जनतेला नेहमीच जास्तीत जास्त शिबिर घेऊन जनतेचे आरोग्य सुधारण्याच काम मी करत आहे.