• Sun. Aug 17th, 2025

महाराष्ट्र लुटारू टोळी महाराष्ट्रातून  हद्दपार करणार-शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने

Byjantaadmin

Aug 16, 2023
महाराष्ट्र लुटारू टोळी महाराष्ट्रातून  हद्दपार करणार-शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने
 दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी शिवसेनेच्या वतीने बिरवली तालुका औसा* येथे नेत्रचिकित्सा व आरोग्य शिबिराचा आयोजन करण्यात आले होते
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने सदरील शिबिराचे उद्घाटक म्हणून व्यासपीठावरून बोलत असताना म्हणाले की स्वातंत्र्याच्या 76 व्या दिनानिमित्त बिरवली व परिसरातील तमाम नागरिक शिवसेनाप्रमुख शिवसेनेचे पदाधिकारी यांना हार्दिक शुभेच्छा तसेच प्रवीण चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमत्ताने आज बिरवली या गावांमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून शिवसेना नेते  चंद्रकांत खैरे  व मराठवाडा समन्वयक शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर यांच्या सूचनेवरून जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण  व माजी आमदार दिनकरराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या कुशल नेतृत्वाखाली सदरील शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून या शिबिरासाठी तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे हे अहोरात्र प्रयत्न करत आहेत आजपर्यंत औसा विधानसभेमध्ये 72 गावांमध्ये सदरील शिबिराचे आयोजन झालेला असून उर्वरित गावांमध्ये नेत्रचिसा व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे एकही गाव सोडले जाणार नाही शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख या नात्याने मला आदेश दिलेला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये खंबीरपणानं शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा टाका सर्वसामान्य माणसाला धीर द्या शेतकरी कष्टकरी शेतमजूर यांना येत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करा या आदेशानुसार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिदोरी घेऊन आणि तमाम शिवसैनिक सर्वसामान्य माणसाचं देणं लागतो या भावनेतूनच जनतेला उपयोगी पडतील अशा बाबीचे नियोजन करीत आहोत धीर देण्याचे काम करत आहोत परंतु हा महाराष्ट्र लुटण्याचा विडा भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील सरकार राज्यातील दळभद्री सरकार यांनी उचललेला आहे सासुरवाडीन दिलेली आंदण गाय समजून नरेंद्र मोदी अमित शहा सांगतील त्या पद्धतीने महाराष्ट्राचे जे काही असणार वैभव आहे जव्हेरी बाजारातील कोस्ट गार्ड असेल आरबीआयचे हेडकॉटर असेल मोठमोठे उद्योग असतील वेदांता फॉक्स्वान असे अनेक उद्योग महाराष्ट्रातून गुजरातला देण्याचं काम महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे या टोळीने चालू केलेले दिसून येत आहे परंतु शिवसेना निश्चित स्वरूपांना शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे  नेतृत्वामध्ये शिवसेनेची बांधणी करून पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे  यांच्या नेतृत्वाखाली सरकार आणणार आणि या टोळीचं षडयंत्र हाणून पाडणार ही टोळी या महाराष्ट्रातून हद्दपार झाल्याशिवाय महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त होणार नाही यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करायचे असतील तर गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक तयार करून या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा झंझावात निर्माण केला पाहिजे अशा स्वरूपाचे नियोजन सर्व पदाधिकाऱ्यांनी करावं असे आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने  यांनी केले याप्रसंगी प्रास्ताविक पर भाषणामध्ये तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे म्हणाले गरिबाला परवडतील श्रीमंताला आवडतील अशा चष्म्याचे वाटपाचा कार्यक्रम या शिबिराच्या माध्यमातून होत आहे चांगल्या प्रतीचे चांगल्या दर्जेचे असणारे चष्मे फक्त दोनशे रुपयांमध्ये देण्याचा मानस शिवसेनेचा असून या शिबिरामध्ये सर्वसामान्य माणसाला दवाखान्याचा खर्च झेपावत नाही म्हणून आम्ही आपल्या गावामध्ये सर्व रोगावर इलाज तोही मोफत करण्याचं नियोजन केलेल आहे तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी गावातील सर्वसामान्य माणसापर्यंत सदरील शिबिराचा लाभ पोहोचवावा असे मत तालुका प्रमुख यांनी व्यक्त केले याप्रसंगी उपस्थीत
 शिवसेना जिल्हाप्रमुख श्री शिवाजीराव माने ,शिवसेना तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे, युवती सेनेच्या जिल्हाधिकारी श्रद्धा ताई जवळगेकर, अल्पसंख्यंक सेल तालुका प्रमुख सलिम पटेल, तालुका समन्वयक संतोष सूर्यवंशी, उप तालुका प्रमुख आबासाहेब पवार, सह समन्वयक महादेव साळुंखे, युवती सेनेच्या तालुका अधिकारी सुचित्राताई साखरे, निलंगा तालुका महीला आघाडीच्या रेखा ताई पुजारी, मीराज पटेल, सुधाकर मुगळे, प्रकाश मुळे,बीरवली गावच्या सरपंच अनिता ताई चव्हाण, चर्मकार संघटना औसा उपतालुका अध्यक्ष प्रवीण चव्हाण, शाहुराज आबा सुरवसे,माजी पोलीस पाटील उमाकांत पाटील माजी चेअरमन व्यंकट शिंदे विश्वनाथ दादा गरड माजी उपसरपंच खंडू गरड ग्रामपंचायत सदस्य बालाजी पवार उमाकांत गरड पप्पू कदम नितीन गरड सुरेश चव्हाण शिवाजी कदम बालाजी गरड दयानंद गरड अदि सह बिरवली गावातील शिवसेना कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *