• Wed. Apr 30th, 2025

योग्य आर्थिक नियोजनातून साखर कारखानदारी यशस्वी झाल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन झाले-माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे प्रतिपादन

Byjantaadmin

Nov 10, 2022

योग्य आर्थिक नियोजनातून साखर कारखानदारी यशस्वी झाल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन झाले-माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे प्रतिपादन

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्याचा ३६ वा गळीत हंगाम शानदार शुभारंभ संपन्न

विलासनगर लातूर :-जिल्ह्यात सतत दुष्काळी भाग म्हणून परिचित असलेल्या आपल्या भागात लोकनेते विलासराव देशमुख यांनी मांजरा साखर कारखान्याची उभारणी करून जे विकासाचे पर्व सुरू केले, ते 37 वर्षानंतर देखील कायम ठेवत असताना योग्य आर्थिक नियोजनातून परिवाराने साखर कारखानदारी यशस्वी करून दाखवली, म्हणूनच येथील शेतकऱ्यांच्या जीवनात मोठ्या प्रमाणात आर्थिक परिवर्तन घडू शकले असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री कारखान्याचे चेअरमन दिलीपरावजी देशमुख यांनी केले

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 36 वा गळीत हंगाम 2022- 23 चा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राज्याचे माजी वैद्यकीय व सांस्कृतिक मंत्री तथा आमदार अमित विलासरावजी देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार तथा लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासरावजी देशमुख , माजी आमदार वैजनाथ शिंदे जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, रेणाचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन श्रीपतराव काकडे, जि. प. सदस्य धनंजय देशमुख, माजी सभापती अँड बाबासाहेब गायकवाड, माजी व्हॉईस चेअरमन जगदीश बावणे, राजकुमार पाटील, प्रवीण पाटील, सचिन दाताळ, संभाजी सुळ, सतीश पाटील, संचालक अशोकराव काळे, तात्यासाहेब देशमुख, वसंत उफाडे, बंकटराव कदम, सदाशिव कदम, अनिल दरकसे, सूर्यकांत पाटील, सचिन शिंदे, निळकंठ बचाटे, धनराज दाताळ, ज्ञानेश्वर पवार, कैलास पाटील, नवनाथ काळे, शेरखॉ पठाण, शंकर बोळंगे, बाबुराव जाधव, महेंद्र भादेकर, ज्ञानेश्वर भिसे, श्रीनिवास देशमुख, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, रेणाचे कार्यकारी संचालक बी.व्ही. मोरे, विलास कारखाना कार्यकारी संचालक संजीव देसाई आदींची प्रमुख उपस्थिती होती.

एफआर पि पेक्षा अधिक दर जास्त देण्याचा प्रयत्न केला

यावेळी बोलताना माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख म्हणाले की, मांजरा कारखान्याने आपल्या सक्षम अशा कार्यातून नावलौकिक मिळवला आहे. हे कार्य करत असताना सातत्याने उत्पादकांना एफआरपी पेक्षा जास्तीचा दर दिला आहे. केवळ आश्वासने देऊन न थांबता प्रत्यक्ष कृतीतून लातूर जिल्ह्यात घडलेला विकासाची अनुभूती येथील लोकांना अनुभवता आली आहे हे वैशिष्ट्य मांजरा परिवाराचे असून मांजरा परिवारातील साखर कारखाने चालवत असताना ते नफ्यात चालले पाहिजेत. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत असताना तो उद्देश आज सफल झाल्याचे आपणास दिसून येत आहे. भविष्यात देखील हेच धोरण राबवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मांजरा साखर कारखान्यामुळे ग्रामीण भागातील लोकांची प्रतिष्ठा वाढली विकासाला चालना मिळाली

यावेळी बोलताना राज्याचे माजी मंत्री आमदार अमितजी देशमुख म्हणाले की, लोकनेते विलासराव देशमुख यांनी नेहमीच आधुनिकतेचा विचार स्वीकारला त्यामुळेच काळाची गरज ओळखून मांजरा परिवारातील साखर कारखान्यात डिस्टीलरी, सहवीजनिर्मिती, थेट ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मीती केली आहे. ऊस तोडणी यंत्राद्वारे उसाची तोड करून एक नवा विचार पुढे येत असून यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने केलेले अर्थसहाय्य मोलाचे ठरत आहे. मांजरा परिवारातील साखर कारखानदारीमुळे जो विकास आपल्या भागात झाला त्याचा लाभ पिढ्यानपिढ्या आपल्या भागातील शेतकऱ्यांना होत राहील. मांजरा कारखान्याने जी वाटचाल केली त्यातून शेतकरी सभासदांची पत वाढली व त्यातूनच शहर व ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळत गेली. चालू गळीत हंगाम हा दमदार राहणार असून सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून तो निश्चितच यशस्वी होईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला व विक्रमी दर देण्याची परंपरा यापुढे देखील सुरू राहील असे त्यांनी सांगितले.

जिल्हा बँकेने सहकार्य केल्याने कारखाने शेतकऱ्यांना विकासाचे पर्व ऊभे राहिले

यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख म्हणाले की, मांजरा कारखान्यात जेव्हा केव्हा आपण येतो तेव्हा लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या समवेत लहानपणी जो काळ घालवला त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्या आठवणी आपणास नेहमीच प्रेरणा देणाऱ्या ठरत असून विलासराव देशमुख साहेबांनी केलेले कार्य हे दिशादर्शक आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने मांजरा परिवारातील साखर कारखान्यांना वेळोवेळी अर्थसहाय्य करून त्या माध्यमातून शेतकरी बांधवांना जी मदत केली आहे त्यातून विकासाचे पर्व उभे राहिले आहे. लातूर जिल्ह्यातील युवकांना हक्काचा रोजगार मिळावा या हेतूने हार्वेस्टर मशीन साठी शेकडो कोटीचे कर्ज उपलब्ध करून दिले व त्यातून अनेकांच्या हाताला काम मिळाले आहे. तसेच उसाच्या लागवडीसाठी एक हजार कोटीचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली आहे. मांजरा परिवारातील सर्व साखर कारखाने आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करून सर्वांचा ऊस वेळेत गाळप करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला व मांजरा कारखान्यास चालू गळीत हंगामाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी चालू गळीत हंगामातील उसाची उपलब्धता व गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची केलेल्या नियोजनाची माहिती आपल्या प्रास्ताविकातून दिली. यावेळी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी कारखान्यांचे खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन सचिन सुर्यवंशी व आभार प्रदर्शन कारखान्याचे स्विकृत संचालक ज्ञानेश्वर भिसे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *