• Sat. Aug 16th, 2025

अक्षय कुमारला मिळाले भारताचे नागरिकत्व; पोस्ट शेअर करत म्हणाला…

Byjantaadmin

Aug 15, 2023

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता  (Akshay Kumar) भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. अक्षयकडे यापूर्वी कॅनडाचे नागरिकत्व होते, त्यामुळे त्याला अनेकदा नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. आता अक्षयला भारताचे नागरिकत्व मिळाले आहे.  नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करुन अक्षयनं याबाबत माहिती दिली आहे.

akshay kumar gets indian citizenship share post says dil aur citizenship dono hindustani Akshay Kumar Indian Citizenship: अक्षय कुमारला मिळाले  भारताचे नागरिकत्व; पोस्ट शेअर करत म्हणाला, 'हृदय आणि नागरिकत्व, दोन्ही भारतीय'

अक्षयनं शेअर केली पोस्ट

अक्षयनं इन्स्टाग्रामवर कागदपत्रांचा फोटो  शेअर करुन भारताचे नागरिकत्व मिळाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. अक्षयनं पोस्टमध्ये लिहिलं, “हृदय आणि नागरिकत्व, दोन्ही भारतीय. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा! जय हिंद!” अक्षयच्या या पोस्टला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

अक्षयच्या पोस्टला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘ट्रोलर्स की बोलती बंद’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘अक्षय तुझे अभिनंदन’

अक्षय कुमारने (Akshay Kumar) 2019 मध्ये एका कार्यक्रमात सांगितले होते की, तो लवकरच भारतीय पासपोर्टसाठी अर्ज करणार आहे. आता त्याला भारतीय पासपोर्ट मिळाला आहे आणि तो भारतीय नागरिक झाला आहे.

अक्षयचा OMG 2  आला प्रेक्षकांच्या भेटीस

अक्षयचा OMG 2 हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. OMG 2 या चित्रपटामध्ये अक्षयसोबत यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. OMG 2 चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर गदर 2 चित्रपटासोबत टक्कर झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *