दत्ताजीराजे जाधवराव यांच्या स्मृतिदिनानिमित्त निलंगा येथील ऐतिहासिक समाधीस्थळी समाधी पूजन व अभिवादन
निलंगा:-राजे लखुजीराव जाधवराव यांचे नातू, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे भाचे व छत्रपती शिवाजी महाराज यांचे मामेभाऊ दत्ताजीराजे बहादुरजीराजे जाधवराव यांचा 357 वा स्मृतिदिन निलंगा शहरालगत असलेल्या ऐतिहासिक समाधीस्थळी समाधी पूजन करून साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून लखुजीराजे जाधवराव यांचे १७ वे वंशज डॉ. नरेशराजे जाधवराव उपस्थित होते.यावेळी त्यांनी दत्ताजीराजे जाधवराव यांचा इतिहास उलगडून सांगितला व समाधी स्थळी समाधी पूजन करून अभिवादन केले, यावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष डॉ. शेषराव शिंदे, जिल्हा संघटक विनोद सोनवणे, इंजि. मोहन घोरपडे,प्रकाश सगरे, सुबोध गाडीवान, सचिन नाईकवाडे, बंटी देशमुख, ओम नाईकवाडे, शिवाजी भंडारे,शुभम सावंत,राजेंद्र सोरडे,शिवाप्पा भुरके,आदी समाजबांधव यांनी उपस्थित राहून स्मृतिदिनानिमित्त अभिवादन केले.