लातुरात एस. टी. ऍक्टिवा अपघातात माय-लेकाचा मृत्यू
लातूर: लातूर शहरातील औसा- लातूर रोडवर छत्रपती संभाजी महाराज चौकात सकाळी अॅक्टीव्हावरून जाणाऱ्या आई- मुलास एस. टी. ने धडक दिल्याने यात अॅक्टीव्हावरील आई व तिचा ८ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला.
प्रचंड वाहतूक असलेला हा चौक आहे. औसा, बार्शी, लातूर शहरात व खोपेगावकडे जाणारा हा रस्ता आहे. या चौकात वाहनधारक आपली वाहने कशीही लावतात, द या चौकात एखादा स्तंभ, रिंगण च नाही कि त्याला वळसा घालावा. इथे वाहतूक पोलीस नसतात, या चौकात सिग्नलही नाही. आज टी अपघात होण्याअगोदर वाहतूक ने पोलीस काही मिनिटे अगोदर होती. च पण ते वाहनांना शिस्त व लावण्यापेक्षा वाहनांची कागदपत्रे, प नंबर प्लेट, तिब्बल सीट याच्याच केसेस करित होते असे प्रत्यक्षदर्शी सांगत होते.
दहाच्या सुमारास बार्शी रोडकडून चौकाकडे येणारी अॅक्टीव्हा एम. एच. २४- बीएम – ३७५४ ला, औसाहून लातूरकडे येणारी एस. टी. एम. एच. १४- बीटी- १४२४ ने धडक दिली असता अॅक्टीव्हा चालविणारी आई व आठ वर्षाचा मुलगा जागीच मरण पावले. चौकात अपघाताचे चित्र अत्यंत विदारक असे होते. मयत मुलगा व महिला सैनिकांचे कुटुंबीय असण्याची शक्यता आहे.