दूरदृष्टी असलेले लोकांच्या मनात कायम राहीलेले लोकनेते विलासराव देशमुख साहेब
राज्यातील अनेक मुख्यमंत्री पदावर कार्यरत असणाऱ्या पैकी एक नाव कायम लोकांच्या मनात राहिलेले म्हणजे लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांचा उल्लेख करावा लागेल महाराष्ट्राच्या राजकारणात असे फार कमी नेते होऊन गेले ज्यानी मराठी माणसाला भुरळ घातली सत्तेच्या सिंहासनावर बसणे आणि कायम लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे यामधे खूप फरक आहे त्यात लोकनेते विलासराव देशमुख साहेब एकमेव राहीले जे की महाराष्ट्राच्या सिंहासनावर बसून राज्यातील तमाम जनतेचे मनावर अधिराज्य गाजवले राज्याच्या इतिहासात लोकांत अढळ स्थान निर्माण करता आले ते लातूरचे सुपुत्र देशाचे माजी केंद्रीय मंत्री राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांचा आज ११ वा स्मृती दीन त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीस विनम्र करतो
सरपंच पदापासून ते थेट मुख्यमंत्री असा प्रवास करत असताना लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांनी कधीच ना पाढा राजकारण केले नाही कोणी कुठला असेल त्याला बघितल नाही सर्वसामान्य माणूस समोर आला की सरळ हाताने पाठीवर हात ठेवून काय अडचण आहे लगेच तात्काळ कारवाई करत त्यांचं समाधान करणारा काम करणारा नेता राज्यात कुठंही जावा शहरात खेड्या पाड्यात अजूनही विलासराव देशमुख साहेब म्हटले की मराठवाड्यातील लातूरचे मुख्यमंत्री आम्हा लोकांचं काम त्यांनी केलं गावाचा रस्ता केला पुल बांधला सरकारी ऑफीस आणले हे फक्त लातूर किंवा मराठवाड्यात नव्हे तर राज्यातील अनेक जिल्ह्यांत विकासासाठी आवश्यक सुविधा त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात निर्माण करुन दिल्या ती कायम आठवण राज्यभर लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा राज्यातील लोकनेता कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांचा लौकिक अजूनही आहे तो कायम राहणार आहे
मागासलेपण पुसून काढले
एकेकाळी मराठवाडा म्हटले की मागास भाग असे म्हणायचे हे मागासलेपण पुसून काढण्याचे काम लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात केले मराठवाडा विभागात दुष्काळी भागात जे जलसिंचनाची कामे झाली आहेत ती आज हरितक्रांती ठरलेली आज दिसत आहेत येणाऱ्या अनेक पिढ्या शेतीच्या बाबतीत समृध्द करण्याचे काम साहेब यांच्या कार्यकाळात झाले हे लोक विसरू शकत नाही कायम आठवणीचा ठेवा राहील असे काम लोकनेते विलासराव देशमुख यांनी केले आहे
साखर कारखानदारीत मांजरा परिवार देशात अव्वल
एकेकाळी साखर कारखानदारी म्हटले की देशात उत्तरप्रदेश राज्यांत पश्चिम महाराष्ट्र अशी गणना व्हायची लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांनी मांजरा साखर कारखाना उभा केला त्यांच्याच परिवारातील आज ९ साखर कारखाने अगदी दिमाखाने उभे आहेत तेही राज्यांत उस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक भाव देणाऱ्या मोजक्या साखर कारखान्यात टॉप २ मध्ये आहेत आज देशात मांजरा साखर परीवार प्रथम क्रमांकावर रास्त भाव तेही एफआरपी सह देणारे कारखाने म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर राज्यात नव्हे देशात ओळख आहे हे सगळ माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात सुरू झालेले साखर कारखानदारी नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम याच परिवाराने केले आहे लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पावलावर पाऊल ठेवून राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सगळी साखर कारखाने अगदी दिमाखाने उभे आहेत ते शेतकऱ्यांचे मंदिर आहेत असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही
आर्थिक क्रांती
लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात जिल्ह्यांतील जलसिंचन प्रकल्प हाती घेतले ते पूर्णत्वास नेले साठवण तलाव बांधले बरेज बांधले पाणी भरपूर असल्याने शेती सुधारली उसाचे क्षेत्र वाढले त्याला जोड मांजरा साखर परिवारातील साखर कारखाने अधिक भाव देणारे असल्याने आर्थिक सुबत्ता मिळाली आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील नवीन योजना तसेच लातूर जिल्ह्यांतील विविध प्रकल्प, भौगोलिक विकासाच्या ज्या पाऊलखुणा दिसत आहेत त्यापैकी लोकनेते लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या कार्यकाळात झालेल्या आहेत अशा दूरदृष्टी असलेले लोकांच्या मनात कायम राहीलेले लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ११ व्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो ..
हरिराम कुलकर्णी
जेष्ठ पत्रकार लातूर
९९७००८१०७७