• Sun. Aug 10th, 2025

शरद पवार-अजित पवार गुप्त भेटीविषयी देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Byjantaadmin

Aug 13, 2023

जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. कारण अजित पवार यांच्यासह काही नेत्यांनी थेट सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सातत्याने शरद पवार यांनी ही भूमिका मान्य करावी यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. भविष्यातलं राजकीय गणित लक्षात घेऊन दोन्ही गट एकत्र व्हावेत अशी भाजपाची इच्छा आहे. अजित पवार हे देखील यासाठी प्रयत्नशील आहेत. अजित पवार यांनी शरद पवारांची गुप्त भेट घेतली अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

What Devendra Fadnavis Said?

शनिवारी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरेगाव पार्क या ठिकाणी अतुल चोराडीया यांच्या बंगल्यात ही भेट झाल्याचं कळतं आहे. जयंत पाटील आणि इतर दोन आमदारही या बैठकीला उपस्थित होते अशीही माहिती समोर आली आहे. या सगळ्या विषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

मला या भेटीविषयी काहीही माहित नाही. ही भेट झाली का? भेट झाली तर त्यात काय चर्चा झाली? यासंदर्भातला कुठलाही तपशील माझ्याकडे नाही. भेट कुठे झाली? किती वेळ चर्चा झाली याविषयी काहीही माहित नाही त्यामुळे मी तुमच्या ज्ञानात भर घालू शकत नाही असं devendra fadnvis यांनी हसत हसत सांगितलं आहे.

महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला काय?

महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला काय आहे? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, “एक समन्वय समिती तयार केलीय. ही समन्वय समिती ठरवेल. कुठलं महामंडळ, कुणाला द्यायच अजून काही ठरलेलं नाही” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *