परमेश्वर शिंदे यांना मराठा सेवा संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान
निलंगा / प्रतिनिधी अल्पावधीत आपल्या निर्भीड लेखणीच्या बळावर नावारूपाला आलेले दै पुण्यनगरी चे निलंगा तालुका प्रतिनिधी परमेश्वर शिंदे यांना मराठा सेवा संघ व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान उदगीर यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा प्रधान झाला. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. विवेक सुकने, व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी कांबळे, सारथीच्या प्रमुख ज्योती ढगे, संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे, शिक्षक नेते शिवाजीराव साखरे वाघ, माधव हलगरे, सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश बेळंबे, कृषीभुषण सुभाष मुळे, सेवा संघाचे जिल्हा सचिव एम.एम. जाधव, अदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज व माॅ जिजाऊचे पुजन करुन जिजाऊ वंदनेने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या पुरस्कार वितरण सोहळ्यात जिल्हास्तरीय महात्मा फुले आदर्श शिक्षक , पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषीरत्न पुरस्कार व तानुबाई बिर्जे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण करण्यात करण्यात आले. परमेश्वर शिंदे यांनी मागच्या दहा वर्षात पत्रकारिता क्षेत्रात आपल्या लेखनीच्या बळावर आपली वेगळी छाप पाडली आहे. शेतकरी, शेतमजूर, नागरी समस्या अदी विविध विषयांवर सडेतोड लिखाण करत अनेकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका त्यांनी बजावली आहे. कोरोना माहामारीच्या काळात अनेक रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी ते कायम प्रयत्नशील होते. आपल्या सुसंस्कृत व प्रेमळ स्वभावामुळे राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीसह सामान्य नागरिकांबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांना यापुर्वीही अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मराठा सेवा संघाच्या पुरस्काराने आणखीन त्यांच्या सन्मानात भर पडली आहे. पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे