महाराष्ट्र महाविद्यालयात नॅक वरील राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न
निलंगाः येथील महाराष्ट्र महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि शासकीय महिला महाविद्यालय, बिदर यांच्या सामंजस्य करारातून एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर हे उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शासकीय महिला महाविद्यालय, बिदरचे प्राचार्य डॅा. मनोज कुमार उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा. माधव कोलपूके हे होते. कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना विजय पाटील निलंगेकर यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण पुरवण्यावर महाविद्यालयांनी भर द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. बदलत्या शैक्षणिक परिप्रेक्षात नॅक मुल्यांकनाचे महत्वही त्यांनी अधोरेखीत केले. या कार्यक्रामाचे प्रमुख पाहुणे आणि साधनव्यक्ती डॅा. मनोजकुमार यांनी या कार्यशाळेच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले. या कार्यशाळेत नॅक मूल्यांकना अंतर्गत येणाऱ्या विविध निकषांवर तीन विविध सत्रांमधून सखोल मार्गदर्शन करण्यात आले. साधन व्यक्ती म्हणून डॅा. के.बी. भिमशा तसेच प्रा. डॅा. विद्या पाटील हे उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रास्ताविक डॅा. ज्ञानेश्वर चौधरी यांनी मांडले तर आभार डॅा. नरेश पिनमकर यांनी मानले. कार्यशाळेतील तिन्ही सत्रांचे सत्राध्यक्ष म्हणून अनुक्रमे डॅा. धनंजय जाधव, डॅा. बालाजी गायकवाड व डॅा. मिलींद चौधरी यांनी काम पाहिले तर सहसत्राध्यक्ष म्हणून अनुक्रमे डॅा. हंसराज भोसले, डॅा. शेषेराव देवनाळकर व डॅा. सुभाष बेंजलवार यांनी काम पाहिले तर सत्रांचे समन्वयक म्हणून डॅा. गोविंद शिवशेट्टे, डॅा. गोपाळ मोघे आणि प्रा. गिरीष पाटील यांनी काम पाहिले. सूत्रसंचलन डॅा. अजित मुळजकर, डॅा. गोविंद शिवशेट्टे, प्रा. सौ. मनीषा घोगरे व प्रा. संदीप सुर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॅा. सुर्यकांत वाकळे, डॅा. सुरेश कुलकर्णी, डॅा. भास्कर गायकवाड, प्रा. रविंद्र मदरसे, प्रा. श्रीनिवास काकडे, प्रा. अक्षय पानकुरे, प्रा. दत्ता पवार, श्री सुहास माने, श्री दत्ता माने, श्री अंगद जाधव, श्री पवन पाटील, श्री नामदेव गाडीवान, श्री भागवत पवार, श्री सिद्धेश्वर कुंभार, श्री दिलीप सोनकांबळे, श्री उमाजी तोरकड व श्री गणेश वाकळे यांनी मोलाचे सहकार्य केले. सदरील कार्यशाळेत वेगवेगळ्या महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक व प्राचार्य उपस्थित होते.