लातुर:ट्रकनं चारचाकीला उडवलं, न्यायाधीशांचा जागीच मृत्यू
लातुर:-लातूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. रेणापूर – उदगीर मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये बीडच्या सेशन कोर्टाचे न्यायाधीश आणि त्यांच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. उद्धव पाटील असं या न्यायाधीशांचं नाव आहे. भरधाव ट्रकनं चारचाकीला धडक दिल्यानं हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की चारचाकीचा देखील चुराडा झाला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, रेणापूर – उदगीर मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रकनं चारचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये न्यायाधीश उद्धव पाटील आणि त्यांच्या चालकाचा मृत्यू झाला. अपघातामध्ये गाडीचं देखील मोठं नुकसान झालं आहे.
वर्षभरापूर्वीच झाली होती नियुक्ती
या अपघातामध्ये न्यायाधीश उद्धव वसंत पाटील आणि त्यांच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. उद्धव पाटील हे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातल्या अजनसोडा येथील रहिवाशी होते. वर्षभरापूर्वीच त्यांची न्यायाधीशपदी निवड झाली होती. ते बीडच्या सेशन कोर्टात कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.