• Sat. Jun 21st, 2025

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी विविध संस्थाच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या घेतल्या भेटी

Byjantaadmin

Aug 10, 2023

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी विविध संस्थाच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या घेतल्या भेटी
उदगीर तालुक्यातील करडखेल पाटी येथे शेतकऱ्यांनी केले स्वागत

लातूर (प्रतिनिधी) राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांची गुरूवार दि. १० ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी भेट घेतली. दिलेल्या निवेदनावरील त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन संबंधितांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या. यानंतर राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख हे नियोजित उदगीर दौऱ्यासाठी जात असताना उदगीर तालुक्यातील करडखेल पाटी येथील छत्रपती संभाजी राजे चौक येथे करडखेल पाटी परिसरातील काँग्रेस पदाधिकारी व शेतकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार अमित देशमुख यांनी शेतकऱ्यांसोबत सध्याची पावसाची स्थिती पेरणीची कामे आदि विषयावर चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *