• Fri. Jun 20th, 2025

पंचाईत:लोकसभेत आज अविश्वास प्रस्तावावर मतदान, राष्ट्रवादीचे 2 व्हीप; 1 समर्थनार्थ, दुसरा विरोधात, नक्की काय होणार?

Byjantaadmin

Aug 10, 2023

मणिपूरच्या मुद्यावरुन विरोधी पक्षांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देतील. तसेच यावर लगेचच मतदान हाईल. या मतदानाच्या वेळी मतदान करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आप-आपल्या खासदारांना व्हीप जारी केले आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देखील दोन व्हीप जारी केले आहेत.यात शरद पवार गटाकडून एक तर अजित पवार गटाकडून दुसरा व्हीप जारी करण्यात आला आहे. यातील एका व्हीपमध्ये प्रस्तावाचे समर्थन तर एका व्हीप मध्ये प्रस्तावाला विरोध करण्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता लोकसभेत काय होणार? या कडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.अविश्वास प्रस्तावार मतदान करण्यासाठी भाजप आणि काँग्रेससह इतर सर्व पक्षांनी व्हीप जारी केला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून खासदार मोहम्मद फैजल यांनी तर अजित पवार गटाकडून सुनिल तटकरे यांनी व्हीप जारी केला आहे. यात अजित पवार गटातून तटकरे हे एकमेव सदस्य आहेत. तर शरद पवार गटात सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फैजल हे चार सदस्य आहेत.

एकमेकांच्या विरोधात व्हीप

शरद पवार आणि अजित पवार गटाकडून एकमेकांविरोधात हे व्हीप जारी करण्यात आले आहे. मात्र, यातील अधिकृत व्हीप कोणता या बाबतचा निर्णय लोकसभा अध्यक्ष घेणार आहेत. मात्र, त्या आधीच दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात उभे असल्याचे दिसून येत आहे.गेल्याच महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्यासह आठ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले आहेत. मात्र, या व्हीपमुळे दोन्ही गटाकडे सर्वांचच लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *