२३८- निलंगा तालुक्यातील बीएलओ यांना दि.१ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार
यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत प्रशिक्षण मा. भारत निवडणूक आयोगाच्या २९ मे २०२३ रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने दि. १ जानेवारी २०२४ या अर्हता दिना आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित झाला आहे. याबाबत २३८ निलंगा २३९ औसा तालुक्यात सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिका-याचे (बीएलओ) प्रशिक्षण देण्यात आले.सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांना दि. १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाबाबतची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. तसेच दिनांक २१ जुलै २०२३ ते २१ ऑगस्ट २०२३ रोजी सर्व बीएलओ यांनी घरोघरी भेटी देऊन संभाव्य नवीन मतदार, दि. १ जानेवारी २०१४ रोजी पात्र होणा-या मतदाराची माहिती संकलित करणे मयत मतदार कायम स्थलातरीत मतदार दुबार मतदार व ८० वर्षावरील मतदार दिव्यांग मतदार यांची माहिती संकलित करणे. तसेच मतदार यादीत आवश्यक दुरुस्त्या करुन त्यांचे काम बीएलओ अॅपद्वारे मतदार नोंदवही या माध्यमातून पूर्ण करण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहे.
23- निलंगा विधानसभा मतदार संघातीत पादी भाग क्र. १४२ शिवणी कोतल येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी श्री. एस. एस. पोस्ट ऑफीस कर्मचारी यांनी दिनांक ०८/०८/२०२३ रोजी एकुण मतदार १११० पडताळणी मतदार १११० दुरुस्ती केलेले मतदार ०८ नवीन मतदार नोंदणी १५. मयत मतदार २० दुबार मतदार ०५ वगळणी केलेले मतदार १५ तर मतदार ०२. सर्व माहिती ऑनलाईन भरलेली आहे. १९१० पैकी १११० मतदार ऑनलाईन Verified केले आहे शिल्लक मतदार ०० १००% मतदार H2H जावून पूर्ण केल्यामुळे मा. सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार निलंगा, श्रीमती उषाकिरण अंगारे मॅडम यांनी तहसिल कार्यालयात बोलवून सत्कार केला.