• Fri. Jun 20th, 2025

श्रीनिवास कोलपुके यांना आलाबामा (अमेरिका) विद्यापीठाकडून पीएचडी पदवी बहाल

Byjantaadmin

Aug 9, 2023
श्रीनिवास कोलपुके   यांना आलाबामा (अमेरिका) विद्यापीठाकडून पीएचडी पदवी बहाल
निलंगा- श्रीनिवास कोलपुके हे निलंगा तालुक्यातील बोरसुरी या गावचे रहिवासी असून त्यांचे प्राथमिक शिक्षण निलंगा येथील महाराष्ट्र प्राथमिक विद्यामंदिर येथे झाले, उच्च माध्यमिक शिक्षण लातूर  येथील व्यंकटेश विद्यालयात झाले, इलेक्ट्रॉनिक्स पदवीचे शिक्षण, बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालय लातूर आणि  पदव्युत्तर (एम.एस.) अभ्यासक्रमाचे शिक्षण हैदराबाद येथील जवाहरलाल नेहरू टेक्निकल विद्यापीठ येथून पूर्ण करुन त्याचे प्रशिक्षण बेंगलोर येथे पूर्ण केले.
दुसरा पदव्युत्तर अभ्यासक्रम अमेरिका येथील कंसास विद्यापीठ येथून एम.एस. एरोस्पेस इंजिनिअरिंग अभ्यासक्रम पूर्ण करून युनिव्हर्सिटी ऑफ अलाबामा, तुस्कालोसा, अलाबामा अमेरिका येथे संशोधन करण्यासाठी (पीएचडी) प्रवेश घेतला. श्रीनिवास यांनी “DEVELOPMENT AND OPTIMIZATION OF AIRBORNE FMCW RADARS FOR HIGH-RESOLUTION SNOW DEPTH MEASUREMENTS” या विषयावर डॉ. शिवप्रसाद गोजनेने यांच्या मार्गदर्शनाखाली आपला शोधनिबंध तयार करून विद्यापीठास सादर केला होता. श्रीनिवास यांना आलाबामा (अमेरिका) विद्यापीठाकडून ५ ऑगष्ट, २०२३ रोजी डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. श्रीनिवास यांनी अत्याधुनिक रडार तयार करून त्याचे परीक्षण ग्रँड  मेसा, कोलोरडो (अमेरिका) येथे केले. श्रीनिवास यांनी संशोधनाच्या दरम्यान वेगवेगळ्या प्रकारचे रडार तयार करून त्याचे जगातल्या विविध ठिकाणी परीक्षणही केले आहे. तसेच संशोधन कार्याच्या वेळी नासा (NASA) तसेच नोवा (NOVA) इत्यादीचे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रास श्रीनिवास यांनी मदत केली आहे. श्रीनिवास यांच्या अत्याधुनिक रडार विविध देशात संशोधनासाठी वापरले जाणार आहे.  श्रीनिवास यांच्या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. विजय पाटील निलंगेकर संस्थासचिव बब्रुवान सरतापे शिक्षण समितीतील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व बोरसुरी ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *