• Thu. Jun 19th, 2025

धक्कादायक.. बलात्कार पीडित महिलेने पोलिस ठाण्यातच केलं विष प्राशन, चंद्रपुरातील प्रकार

Byjantaadmin

Aug 9, 2023

चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कार पीडित महिलेने पोलीस ठाण्यातच विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बलात्कार करणाऱ्या आरोपीला जामीन मिळवून देण्यास मदत करणाऱ्या पीएसआयवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महिलेने विष पिले. वरोरा पोलीस ठाण्यात हा धक्कादायक प्रकार घडला. महिलेने आरोप केलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव निलेश चौरे असे आहे.बलात्कार केलेल्या आरोपीचे नाव इरफान शेख असे असून ३६ वर्षीय पीडित महिलेनेऑक्टोबर २०२२ मध्ये त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती. आरोपीवर ३७६ आणि एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून अटक झाली होती. मात्र या प्रकरणात आरोपीला जामीन मिळाल्यावर आरोपी आणि त्याचे नातलग त्रास देत असल्याचा पीडित महिलेचा आरोप होता. सोबतच आरोपींना वरोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश चौरे मदत करत असल्याचाआरोप देखील महिलेने केला होता.सहायक पोलीस निरीक्षक निलेश चौरे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महिलेने वरोरा येथे पत्रकार परिषद घेतली होती. मात्र तरीही आरोपीवर कोणतीही कारवाई न झाल्याने महिलेने वरोरा पोलीसठाणे गाठून तेथेचविष घेतले. महिलेला प्रथमवरोरा उपजिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *