• Thu. Jun 19th, 2025

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची कोल्हापूरच्या बाजार समितीचे सभापती भारत पाटील यांनी घेतली भेट

Byjantaadmin

Aug 9, 2023
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची कोल्हापूरच्या बाजार समितीचे सभापती भारत पाटील यांनी घेतली भेट
लातूर ;- कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भारत पाटील सचिव जयवंत पाटील ,सहाय्यक सचिव के बी पाटील, सहाय्यक सचिव मनोज पाटील यांच्या शिष्टमंडळाने  मंगळवारी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी लातूर बाजार समितीच्या वतीने सुरू असलेल्या विविध कार्याची माहिती घेतली  लातूरच्या बाजार समितीच्या कार्याचे कौतुक केले यावेळी कोल्हापूर बाजार समितीचे सभापती भारत पाटील यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांचा सत्कार केला
लातूर बाजार समितीची कोल्हापूर बाजार समितीच्या शिष्टमंडळाकडून पाहणी
तत्पूर्वी कोल्हापूर च्या बाजार समितीचे शिष्टमंडळाने लातूर येथील बाजार समितीला भेट देऊन  लातूर बाजार समितीच्या वतीने सुरू असलेल्या शेतमाल तारण योजना , शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी असलेले वस्तीगृह, भोजन व्यवस्था, आडत लाईन आदीची पाहणी केली व कार्याचे कौतुक केले  यावेळी  राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे उपसभापती सुनिल पडीले, सचिव भगवान दुधाटे, संचालक  पाटील, संचालक बालाजी वाघमारे, संचालक शिवाजी कांबळे, लातूर बाजार समितीचे सहाय्यक सचिव सतीश भोसले, लातूर बाजार समिती, कोल्हापूर बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *