• Thu. Jun 19th, 2025

मुलींच्या वसतिगृहासाठी शुद्ध पेयजल उपकरण रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचा उपक्रम 

Byjantaadmin

Aug 8, 2023
मुलींच्या वसतिगृहासाठी शुद्ध पेयजल उपकरण रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचा उपक्रम
लातूर/प्रतिनिधी:रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने मुलींसाठी शुद्ध व थंड पेयजल उपलब्ध करून देणाऱ्या उपकरणाचे लोकार्पण करण्यात आले.
 रोटरीच्या महिला सक्षमीकरण,जल व स्वच्छता तसेच समुदाय विकास अंतर्गत आर्य वैश्य प्रतिष्ठान,लातूर मार्फत चालवल्या जाणाऱ्या ग्रामीण,शेतकरी कुटुंबातील मुलींच्या वसतिगृहात प्रतितास १०० लिटर क्षमतेचा RO सिस्टम वॉटर फिल्टर व थंड पाणी पुरवठा होण्यासाठी वॉटर चिलर बसवण्यात आले. याचा लोकार्पण सोहळा रोटरी डिस्ट्रिक्टचे माजी प्रांतपाल हरिप्रसाद सोमाणी व माजी अध्यक्ष गुरूनाथ मगे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.उमेश पत्रावळे यांनी परिश्रम घेतलेल्या या योजनेतून प्रतिवर्ष ६० ते ६५ मुलींना लाभ मिळणार आहे.
   याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ लातूर  मिडटाऊनचे अध्यक्ष रविंद्र बनकर, सचिव किशोर दाताळ,माजी अध्यक्ष डॉ. सोपानराव जटाळ,  विष्णुदास तोष्णीवाल, पर्वत नागुरे,शिवकांत ब्रिजवासी,गोविंद कुंचमवार,सुनिल पराडेंकर,सीए राजगोपाल सारडा,शशिकांत मोरलावार,वीरेंद्र फुंडीपल्ले यांच्यासह माजी सचिव अनिल पाटील,लक्ष्मीकांत आग्रोया,बालाप्रसाद आग्रोया,अनिल टाकळकर,संचालक उमा व्यास,सोनु डगवाले, कलश मुंदडा,मन्मथ पंचाक्षरी,मोतीलाल वर्मा, अमोल बनाळे व संजय रेवडकर यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *