• Wed. Jun 18th, 2025

फ्रेंडशिप डे’ला झाडांशी मैत्री!

Byjantaadmin

Aug 6, 2023

फ्रेंडशिप डे’ला झाडांशी मैत्री
लातुर:-ऑगस्ट महिन्याची सुरुवात झाली, की तरुणाईला वेध लागतात ते ‘फ्रेंडशिप डे’चे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी आपल्या मित्र-मैत्रिणींना ‘फ्रेंडशिप बँड’ बांधून हा दिवस साजरा केला जातो;मात्र या वर्षी लातूरात हा दिवस झाडांशी मैत्री करून व झाडे लावून साजरा करण्यात आला.
त्यासाठी ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या पर्यावरणप्रेमी सदस्यांनी पुढाकार घेतला. या वर्षी फ्रेंडशिप डे सहा ऑगस्ट रोजी आहे.
या दिनाचे औचित्य साधून ग्रीन लातूर वृक्ष टीम व नांदगाव ग्रामपंचायत नागरिक यांच्यामार्फत २५० मोठ्या पर्यावरणपुरक देशी धार्मीक म्हत्व असलेल्या झाडांचे रोपण करण्यात आले.
याबरोबरच ग्रीन लातूर वृक्ष टीमने  स्थानिक नागरिकांना २०० फुलझाडांचे मोफत केले.यापूर्वी ग्रीन लातूर वृक्ष टीमने लातूर जिल्ह्यात एक लाख वीस हजार झाडे लावून त्यांचे संगोपन केले आहे.आता ‘चला करू या झाडांशी मैत्री’असे म्हणत ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या पर्यावरणप्रेमी सदस्यांनी व नांदगाव ग्रामस्थांनी झाडांसोबत ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला आहे. यावेळी झाडांचे संगोपन करण्याची मैत्रीपूर्ण प्रतिज्ञा नांदगाव ग्रामस्थांनी घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *