• Wed. Jun 18th, 2025

राहुल गांधींना पुन्हा खासदारकी मिळणार… मानहानीप्रकरणी शिक्षेला स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

Byjantaadmin

Aug 4, 2023

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला असून मोदी आडनावाच्या मानहाणीप्रकरणी मिळालेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी पुन्हा मिळणार आहे.

Rahul Gandhi Modi Surname Case Supreme Court Interim Order Stays Conviction of Congress leader Rahul Gandhi marathi news Rahul Gandhi: राहुल गांधींना पुन्हा खासदारकी मिळणार... मानहानीप्रकरणी शिक्षेला स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

 

मोदी आडनावाची मानहानी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना गुजरातच्या न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली होती. या निर्णयाच्या विरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने आता राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना आता त्यांची खासदारकी पुन्हा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *