लंपीरोग लसीकरण सुरु ९९२ पशूधनानी घेतला लाभ बाजार समिती व पशूसंवर्धन विभागाचा उपक्रम -सभापती जगदीश बावणे यांची माहिती
लातूर -कृषि पशुसंवर्धन विभाग व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारपासून सुरू करण्यात आलेल्या लंपीरोग लसीकरण शिबिर लातूर तालुक्यातील हरंगुल, टाकळी मसला, आखरवाई, काटगाव, जवळा (बू )या ठिकाणीं गुरुवारी घेण्यात आले असून या पाच गावातील ९९२ पशूधनानी त्यात गाय, वासरू, बैल याना लस देण्यात आली आहे लातूर तालुक्यात लंपीरोग पसरू नये यासाठी २५ गावात शिबिर घेण्यात येणार असे यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती जगदीश बावणे यांनी बोलताना सांगितले आहे
लंपीरोग शिबिराचे उद्घाटन लातूर तालुक्यातील हरंगुळ खु येथे करण्यात आले त्यावेळी कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे तर प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती सुनिल पडीले, बाजार समितीचे संचालक आनंद पवार हरंगुळ चे सरपंच मनोहर झुंजे , पंचायत समिती विस्तार अधिकारी डॉ एस एस बुकसेटवारडॉ किशोर माने डॉ रेड्डी, डॉ उदारे डॉ कुलकर्णी यावेळी उपस्थित होते
यावेळी बोलताना सभापति जगदीश बावणे यांनी सांगितले की पावसाळी अधिवेशनात विधी मंडळाच्या सभागृहात राज्याचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी लंपि रोग वाढत असल्याबाबत राज्य सरकारकडे लक्ष वेधले होते तसेच तसेच त्यांनी पशू संवर्धन विभागाकडे याबाबत लंपी रोग लसीकरण शिबिर घ्यावीत तशा सुचना बाजार समितीस दिल्या होत्या त्यानूसार राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अमित विलासराव देशमुख आमदार धीरज देशमुख यांच्या सूचनेनुसार पशुसंवर्धन विभाग लातूर बाजार समिती ने पुढाकार घेऊन पशूधनाना लस देण्यात येत असून याला पशुधन मालकांनी मोठा प्रतिसाद देवुन आपल्या पशूला लस देण्यासाठी पुढाकार घेतला आहे असे सांगून ४ ऑगस्ट ५,७,८ ऑगस्ट हे चार दिवसात ३५ गावात लंपी रोग शिबिर लातूर तालुक्यात घेणार असून त्यात पशुधन मालकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे उपसभापती सुनिल पडीले, सचिव भगवान दुधाटे संचालक मंडळ यांनी केले आहे
कार्यक्रमास शेतकरी शाम चापुले, धनराज पाटील, बंकट सुर्यवंशी बंडू मसलकर, ग्यांनदेव होळकर, उमाकांत भुजबळ, शिवाजी झुंजे, चंद्रकांत भुजबळ यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमांचे सूत्रसंचलन बाजार समितीचे सहाय्यक सचिव भास्कर शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन बाजार समितीचे सचिव भगवान दुधाटे यांनी मांडले
४ ऑगस्ट रोजी बाभळगाव चाटा, साई, शिराळा, मुरुडाकोला, रामेगाव लम्पी रोग लस शिबिर होणार