जागृती शुगरच्या चालु हंगामातील मील रोलर पूजन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न
परिवारातील सर्व साखर कारखान्याचे पदाधिकारी संचालकांची उपस्थिती
लातूर ;- राज्यात खाजगी साखर कारखानदारीत एफ. आर.पी.पेक्षा अधिक उस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक भाव देणारा असा नावलौकिक असलेल्या देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर कारखान्याच्या २०२३- २४ चालु गाळप हंगामातील मील रोलर पूजन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीपरावजी देशमुख यांच्या शुभ हस्ते मांजरा साखर परिवारातील विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत २ ऑगस्ट रोजी बुधवारी करण्यात आले
जागृती शेतकऱ्यांची प्रगती
जागृती शुगर कारखान्याची वाटचाल माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असुन कारखान्याच्या अध्यक्षा सौ गौरवी अतुलजी भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांच्या सूचनेनुसार आजतागायत ११ गाळप हंगाम यशस्वीपणे पार पडले असून *जागृती शेतकऱ्यांची प्रगती* या ब्रीद वाक्याप्रमाणे कारखाना संचालक मंडळाने उस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक भाव देवुन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले आहे जे की आजतागायत सुरू आहे हा साखर कारखाना महाराष्ट्र -कर्नाटक- आंध्रा- तेलंगणा या चार सीमेवर असून गेल्या १० वर्षात कारखाना सुरु झाल्याने या भागातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी आवश्यक प्रयत्न कारखाना संचालक मंडळाने केले आहे आज या भागात आर्थिक सुबत्ता मिळाली असल्याचे चित्र दिसून येत आहे
प्रमूख अतिथी म्हणून माजी आमदार अँड त्रिंबक भिसे राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष यशवंतराव पाटील जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे संचालक दिलीप माने, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अँड श्रीपतराव काकडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, उदगीर बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ दिलीप पाटील नागराळकर, रेणा चे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्याम भोसले , उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, देवणी तालुका काँग्रेस अध्यक्ष अँड अजित बेळकोने जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव, जागृती शुगरचे सरव्यवस्थापक गणेश येवले आदी मान्यवर उपस्थित होते
याप्रसंगी कार्यक्रमास इंदिरा सूतगिरणी चे अध्यक्ष बाळासाहेब पाटील,मारुती महाराज साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष उदयसिंह देशमुख, रेणा साखर कारखान्याचे संचालक संभाजी रेड्डी, मारुती महाराज साखर कारखान्याचे संचालक सचिन पाटील, मांजरा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री देसाई,मारुती महाराज साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे सचिन दाताळ, राम भंडारे , बालाजी कारभारी, सतीश पाटील, सुपर्ण जगताप, गजानन भोपनिकर,शिवाजी कांबळे, बालाजी बोबडे, शशिकांत कदम, धनाजी कोटे, भगवान गायकवाड, मालबा घोणसे, कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी रामानंद कदम, चीफ इंजिनियर अतुल दरेकर, चिफ लेखा अधिकारी सतीश वाकडे, डीस्टलरी इन्चार्ज विलास पाटील,अधिकारी कर्मचारी, कामगार उस उत्पादक शेतकरी, मोठया संख्येने उपस्थित होते