• Tue. Apr 29th, 2025

फक्त मुद्द्याचं बोलूया… रोहित पवार यांच्या हटके टी-शर्टची चर्चा विधीमंडळ अधिवेशनात चर्चा

Byjantaadmin

Aug 2, 2023

कर्जत जामखेडमध्ये  रोजगाराच्या अडचणी सुटाव्या म्हणून एमआयडीसी आवश्यक आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार  यांनी मांडत नुकतेच आंदोलन  केले होते. युवकांच्या सह्यांचे पत्र देखील त्यांनी नुकतेच उद्योग मंत्री उदय सामंत) यांना दिले होते. आज तर त्यांनी हटके टी-शर्ट घालून विधानभवनात प्रवेश केला. क्रिम कलरच्या या जॅकेटवर कर्जत एमआयडीसीबाबत भाष्य करण्यात आलं आहे. या टी-शर्टवर समोरच्या बाजूला मोठ्या अक्षरात MIDC असं लिहिलं असून मागच्या बाजूला “ध्येय विकासाचं ठेवूया, वेध भविष्याचा घेऊया, युवाशक्तीला संधी देऊया आणि फक्त मुद्दयाचं बोलूया!”, असा मजकूर लिहिण्यात आला आहे.

Rohit Pawar wears unique t-shirt in the Maharashtra legislative monsoon session Youth issues wrote on a t shirt Rohit Pawar T-Shirt : फक्त मुद्द्याचं बोलूया... रोहित पवार यांच्या हटके टी-शर्टची चर्चा विधीमंडळ अधिवेशनात चर्चा

कर्जत एमआयडीसीसाठी रोहित पवार आग्रही

कर्जतमध्ये एमआयडीसी यावी, यासाठी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आग्रही आहेत. यासाठी काही दिवसांपासून रोहित पवार आक्रमक भूमिका पाहायला मिळत आहे. त्यांनी भर पावसात उपोषणही केलं. विधीमंडळ अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आहे, अशातच रोहित पवार यांनी कर्जतमधील एमआयडीसीचा मुद्दा लावून धरला आहे. रोहित पवार यांनी आज हटके टी-शर्ट परिधान करत अधिवेशनाला हजेरी लावल्याने या टी-शर्टची सर्वत्र चर्चा होत आहे.

उद्योगमंत्र्यांना जॅकेट आवडलं असेल तर उद्योगाचे प्रश्न सोडवावे : रोहित पवार

या टी-शर्टबद्दल विचारलं असता रोहित पवार म्हणाले की, “हे टी-शर्ट मला माझ्या मित्राने दिलं आहे. एका युवा मित्राने दिले आहे. मी जे मुद्दे विधानसभेत मांडत आहे त्याबाबत या युवाने मला हे जॅकेट दिलं आहे. काही लोक समाजात खालच्या पातळीवर बोलून तेढ निर्माण करत आहेत. आज योगायोगाने आतमध्ये आलो तेव्हा उद्योग मंत्री उदय सामंत आले. उद्योग मंत्र्यांना देखील टी-शर्ट आवडले असेल तर त्यांनी उद्योगाचे प्रश्न सोडवावे.” याबाबत त्यांनी ट्वीट देखील केलं आहे, ज्यात त्यांनी या टी-शर्टच्या मागची गोष्ट सांगितली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed