आँगस्ट महिन्याची सुरूवातच एका गुडन्यूजने झाली आहे. आज मंगळवारी १ ऑगस्टला तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजीच्या दरात तब्बल १०० रुपयांनी किंमती कमी केल्या आहेत. तत्पूर्वी जुलै महिन्यात १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरमध्ये ७ रुपयांची किरकोळ वाढ करण्यात आली आहे.या आनंदवार्ताने हाॅटेल व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. पण १४ किलोच्या घरगुती एलपीजी गॅस दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
प्रमुख महानगरांमधील दरकपातीनंतर झालेला बदल
तेल कंपन्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजीच्या दरात बदल करतात. त्यानुसार व्यावसायिक एलपीजीच्या किंमतीत १०० रुपयांची घट झाली आहे. मुंबईत व्यावसायिक एलपीजीच्या किंमती १,७३३.५० रुपये प्रति किलोंच्या घरात आहेत. त्या आता नव्या सुधारित दर कपातीनंतर अंदाजे १६३३.५० रुपये प्रति किलों असतील. राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत १६८० रुपयांवर पोहोचली आहे, हे दर गेल्या महिन्यातील दर वाढीनंतर ४ जुलै रोजी १७८० रुपयांवर पोहोचली होती.कोलकातामध्ये १८०२.५० रुपये असलेले दर १०० रुपयांच्या कपातीनंतर अंदाजे १७०२.५० रुपये प्रति किलों असतील. तर चेन्नईमध्ये १८५२.५० रुपये असलेले दर आता १७५२.५० रुपये करण्यात आले आहेत.
घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती
घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तेल कंपन्यांनी १ मार्च रोजी दरात बदल केले होते. त्यामुळे १४.२ किलो सिलेंडरच्या किंमतीत बदल झालेला नाही. अशा स्थितीत मुंबईत विनाअनुदानित १४.२ किलो एलपीजी सिलिंडर ११०२.५० रुपये दराने उपलब्ध आहे.