• Tue. Jun 17th, 2025

काँग्रेस नेत्यांना धमक्यांचे सत्र सुरूच ; पृथ्वीराज चव्हाणांनंतर यशोमती ठाकूर यांना धमकी..

Byjantaadmin

Jul 31, 2023

संभाजी भिडे प्रकरणात काँग्रेस नेत्यांना धमक्यांचे सत्र सुरूच आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धमकी आल्यानंतर आता काँग्रेसच्या नेत्या, माजी मंत्री, आमदार यशोमती ठाकूर यांना टि्वटवरून धमकी देण्यात आली आहे. कैलास सुर्यवंशी असे टि्वटर हॅडल असलेल्या व्यक्तीने यशोमती ठाकूरयांना धमकी दिली आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा संदर्भ त्याने यात दिला आहे. कैलास सुर्यवंशी हा कोणत्या संघटनेशी संबधीत आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संभाजी भिडे यांना अटक करा, या मागणीसाठी यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या आहेत. अमरावती जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर आज त्या आंदोलन करणार आहेत.काल (रविवारी) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचा ई मेल आणि फोन आला आहे. याप्रकरणी अंकुश सोराटे याला राजगडच्या पायथ्याशी असणाऱ्या वेल्हा गावातून कराड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून आक्रमक झालेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विधीमंडळ अधिवेशनात केली होती. यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संपर्क केला आहे. अंकुश सोराटे याच्यावर सायबर कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Sambaji Bhide Statement Mahatma Gandhi Yashomati Thakur News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *