दोन्ही आमदारांना विकासाचा एवढा पुळका असेल तर निलंग्याला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व कासारसिरशी तालुका करा-अशोकराव पाटील निलंगेकर
निलंगा- सध्या निलंगा व औसा विधानसभेचे आमदार यांच्या अंतर्गत राजकीय वादामुळे निलंगा तालुक्यातील औसा विधानसभा मतदार संघाला 63 गावे जोडली आहेत.परंतु भाजप च्या राजकीय अंतर्गत गटबाजीचा फटका कासार सिरशी सर्कल च्या सामान्य नागरिकांना बसत आहे.याचा हकनाक त्रास सहन करावा लागतो.तुमच्या अंतर्गत राजकारणाचा आम्हाला काहीही संबंध नाही निलंग्याचे आमदार पडद्यामाघून व औसाचे आमदार पडदा घेऊन राजकारण करतात.कासार सिरशी सर्कलच्या काँग्रेसच्या सरपंच व उपसरपंच यांना चुकीची माहिती देऊन संभ्रम निर्माण करतात.या सर्व गोष्टी जनतेला विश्वासात घेऊन करणे गरजेचे आहे.याकरिता दावे प्रतिदावे करण्यासाठी मा.जिल्हाधिकारी यांनी अधिसूची काढावी. विकास व्हावा ही आमची प्रांजळ भूमिका आहे.परंतु विकास करताना दूरदृष्टी असली पाहिजे. स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबानी निलंगा तालुकाच नाहीतर महाराष्ट्रामध्ये अनेक विकास कामे दूरदृष्टी समोर ठेऊन केलीली आहेत. निलंगा शहराला जिल्ह्यासारखे महत्व प्राप्त केले असून अनेक विभागीय कार्यालय शहरामध्ये उपलब्ध असून हे कार्यालय टिकून राहावे यासाठी निलंग्याचे आमदार प्रयत्न केलेले दिसत नाहीत. याउलट औसाच्या आमदारांनी सा.बा. विभागाचे कार्यालय इतरत्र घेऊन जाऊन विकास कामाला खिळ घातली. व कार्यालय फोडाफोडी करून इतर हलविण्याचे पाप हे आमदार महाशय करतात ही फार मोठी शोकांतिका आहे.गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये विकास कामे करण्यासाठी निधी आणले नाहीत.स्वतःच्या राजकारणासाठी केलेल्या विकास कामाचे तुकडे करणे,नवीन योजना न आणणे याला विकास म्हणायचा काय?जर दोन्ही आमदारमध्ये व ट्रिपल इंजिन सरकार मध्ये हिम्मत असेल तर निलंग्याला अप्पर जिल्हाधिकारी चे कार्यालय व कासार सिरशी तालुका करा अशी मागणी अशोकराव पाटील निलंगेकर यांनी केली. यावेळी अशोकराव पाटील पुढे म्हणाले की,स्व.शिवाजीराव पाटील निलंगेकर हे धर्मनिरपेक्षवादी विचाराचे व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते होते.जातीवादी विचाराच्या लोकांना स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नाव वापरण्याचा नैतिक अधिकार नाही.यापुढे जर साहेबाच्या नावाचा वापर करून कोणी राजकीय पोळी भाजत असेल तर मला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल असे ते म्हणाले यावेळी अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा.दयानंद चोपणे,निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे,लातूर जि.काँग्रेस उपाध्यक्ष (मा.सेल) गोविंद सूर्यवंशी,औरादचे शहराध्यक्ष हाजी सराफ,मा.सभापती नागनाथ पाटील,माजी.उपसभापती माधवराव पोळ,मा.कृषी सभापती हलाप्पा कोकणे,मा.जि. प.सदस्य भीमराव पाटील, गोविंद पाटील मदनसुरीकर,उमाकांत माचना, सुरेश बिराजदार,सुनील मुळे,प्रदीप नेलवाडे, इ पदाधिकारी उपस्थित होते.