• Tue. Jun 10th, 2025

कासारशिरसी येथील प्रस्तावीत अपर तहसील कार्यालय प्रकरण:नागरिकांत संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप

Byjantaadmin

Jul 29, 2023
कासारशिरसी येथील प्रस्तावीत अपर तहसील कार्यालय प्रकरण:नागरिकांत संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप
निलंगा (प्रतिनिधी)तहसीलवरून सुरू असलेला वाद भाजपच्या दोन्ही आमदारांचा आहे. यात तू मोठा की मी मोठा असा वाद आहे. भविष्यात कासारशिरसी, औराद शहाजनी, किल्लारी ही तालुके म्हणून उदयास आले तर आनंदच आहे परंतु हा वाद चव्हाट्यावर आणणे चुकीचे
कासारशिरसी येथील प्रस्तावीत अपर तहसील कार्यालयासंदर्भात आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडून डॉ .शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नावे कृती समितीची स्थापन करुन नागरिकांत आहे. संभ्रम निर्माण केला जात आहे. या वादाशी कॉंग्रेस पार्टी व महाविकास आघाडीचा संबंध नाही, असे काँग्रेस पार्टी निलंगा, शिवसेना उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट व संभाजी ब्रिगेडच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे. कास
विकासाचे राजकारण करीत असताना जिल्ह्यातील नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर, लोकनेते विलासराव देशमुख, माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांनी कधीही राजकारण केले नाही. नेत्याचे नाव, फोटो वापरून जनतेस संकटात टाकू नये, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, माजी सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, तालुकाकार्याध्यक्ष अँड. नारायण सोमवंशी, काँग्रेस डॉ. सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद भातांब्रे, निलंगा कॉंग्रेसचे प्रवक्ते चक्रधर शेळके, माधवराव पाटील, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख विनोद आर्य, जिल्हा उपप्रमुख हरिभाऊ सगरे, महिला तालुकाध्यक्ष रेखा पुजारी राष्ट्रवादी काँग्रेस पंडितराव धुमाळे, शहराध्यक्ष इस्माईल लदाफ, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रमोद कदम, संतोष सोमवंशी यांच्या स्वाक्षया आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *