• Tue. Jun 10th, 2025

ड्रायव्हरची आई गेली; सांत्वनास निघालो, तोच त्याच्याच निधनाचं वृत्त, आ.अभिमन्यू पवार शोकाकुल

Byjantaadmin

Jul 29, 2023

लातूर : भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्या वाहन चालकाचे अकस्मात निधन झाले. विजेचा तीव्र धक्का बसल्याने पवारांच्या ड्रायव्हरचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यानंतर अभिमन्यू पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. धक्कादायक म्हणजे ड्रायव्हरच्या आईच्या निधनानंतर अवघ्या दोनच दिवसात त्याचाही दुर्दैवी मृत्यू ओढावला.

अभिमन्यू पवार यांचे ट्वीट काय?

भावपूर्ण श्रद्धांजली तुकाराम, तुकारामचं अकाली जाणं माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूपच धक्कादायक आणि दुःखदायक आहे, असं म्हणत अभिमन्यू पवारांनी तुकारामचा फोटो शेअर केला आहे. माझा ड्रायव्हर, माझा अत्यंत जीवाभावाचा आणि विश्वासू सहकारी, माझ्या संपूर्ण परिवाराचा अत्यंत विश्वासू ड्रायव्हर, आमच्या कुटुंबाचाच एक भाग असलेल्या तुकाराम नागाळेचा करंट लागून मृत्यू झाल्याचे वृत्त माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी खूपच धक्कादायक आणि दुःखदायक आहे.तुकाराम माझ्या कुटुंबाचा खूप मोठा आधार होता, माझं कुटुंब कुठंही प्रवास करत असलं आणि गाडीचं स्टेरिंग तुकारामच्या हातात असलं की मी निश्चिंत असायचो. तुकारामच्या बाजूला एखादी व्यक्ती बसलीय आणि ती खळखळून हसली नाही असं कधीच व्हायचं नाही. माझे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार आणि पक्षातील सहकारी कार्यकर्ते या सर्वांचा तो प्रिय होता.परवाच त्याच्या आईचे निधन झाले, उद्या मसलाला त्याच्या घरी सांत्वनासाठी जाण्याचे नियोजन होते आणि काही वेळापूर्वी त्याचाच मृत्यू झाल्याचे समजले. भावपूर्ण श्रद्धांजली तुकाराम. माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या स्मरणात तू कायम राहशील. ओम शांती, अशा भावना अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *