• Wed. Jun 18th, 2025

औसा तालुक्यातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आरोग्य शिबीर संपन्न

Byjantaadmin

Jul 27, 2023
औसा तालुक्यातील वाघोली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आरोग्य शिबीर संपन्न
– वाघोली येथे शिवसेनेच्या आरोग्य शिबिराचे उदघाटन शिवसेना तालुका प्रमुख तानाजी सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले.
लातूर- संकटकाळात गोरगरीब सामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी लढणारी, त्यांच्या सेवेसाठी तत्परतेने धावून जाणारी शिवसेना एकमेव आहे. असे प्रतिपादन शिवसेनेचे औसा तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे यांनी आज मोगरगा येथे केले. औसा तालुक्यातील वाघोली येथ 26 जुलै रोजी लातूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या कुशल नेतृत्वाखाली आयोजित आरोग्य चिकित्सा व नेत्र तपासणी शिबीराचे आयोज  करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांच्या  वाढदिवसाच्या  निमित्ताने शिवसेना लातूर जिल्हा संपर्कप्रमुख रोहीदास चव्हाण व औसा तालुक्याचे माजी आमदार दिनकरराव माने ,यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका प्रमुख तानाजी सुरवसे यांच्या पुढाकाराने संपूर्ण औसा तालुक्यात  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने  आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेतून लातूर जिल्हा शिवसेना  व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना उपनेते तथा मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरुरकर  यांच्या सूचनेवरून  औसा तालुक्यातील 105 गावामधे आरोग्य चिकित्सा, नेत्र तपासणी व रक्तदान शिबिरे घेण्यात येत आहेत. आज 26 जुलै रोजी  वाघोली या गावात आरोग्य चिकित्सा व नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
.यावेळी लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या टीमचे डॉ.रवींद्र चव्हाण ,डॉ. शरद चव्हाण ,डॉ. शुभम भोसले हे सर्व डॉक्टर्स  आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आरोग्य व नेत्र तपासणी शिबाराबद्धल माहिती देत औसा तालुक्यातील सदर आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे यांनी केले. तसेच या शिबिरामध्ये सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, गुडघेदुखी, कंबर दुखी या सर्व तपासण्या होऊन त्याच ठिकाणी नागरिकांना औषध उपचार देण्यात आले.यावेळी , शिवसेना औसा तालुका प्रमुख तानाजी सुरवसे, शिवसेना तालुका समन्वय संतोष भाऊ सूर्यवंशी शिवसेना औसा तालुका अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष सलीम पटेल, उप तालुका प्रमुख विजय पवार, विशाल पवार, उप सरपंच गोपीचंद पवार, पंढरी पवार,जेष्ठ शिवसैनिक गणपतराव पाटील, आबाजी पवार, राहुल मोरे, राजू पवार,विशाल पवार, सह  शिवसैनिक गावकरी उपास्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *