जेष्ठ लोक कलावंतांच्या विविध प्रश्नासाठी लातूर शहर जिल्हा काँगेस व जिल्हा काँग्रेस कमिटी कडून लातुरात धरणे आंदोलन
लातूर प्रतिनिधी-आपल्या कलेचे विविध कला प्रकारात सादरीकरण करून श्रोत्यांची मने जिंकलेल्या जेष्ठ कलावंताच्या विविध प्रलंबित प्रश्नावर लातूर शहर जिल्हाकाँग्रेस कमिटी च्या वतीने सोमवार दिनांक २४ जुलै रोजी लातूर शहरातील महात्मा गांधी चौक भागात भव्य धरणे आंदोलन करण्यात आले.जेष्ठ कलावंतांना पद्मश्री, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करावे,लोककवि वामनदादा कर्डक यांच्या नावाने लोककलावंत आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे,सरकारी घरकुल योजनेत कलावंतांसाठी १०टक्के राखीव कोटा ठेवावा,राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी साहित्य सम्मेलन आयोजित करावे,शासकीय पुरस्कार प्राप्त कलावंतांना साध्या एसटी बस प्रमाणे शिवशाही बस मधून देखील मोफत प्रवास सुविधा द्दावी,लातूर येथील वयोवृद्ध कलावंत मानधन समिती लवकरात लवकर गठीत करावी,यासह अन्य मागण्यांसाठी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच नाट्य सांस्कृतिक सेल लातूरचे अध्यक्ष नागसेन कामेगावकर, विपुल हाके, लोककलावंत सांस्कृतिक सेल लातूर जिल्हाध्यक्ष राजकुमार सकपाळ व सहकारी यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी लातूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुभाष घोडके, पृथ्वीराज शिरसाठ, स्मिता खानापुरे,सपना किसवे, रमेश सूर्यवंशी, प्रा.एकनाथ पाटील,प्रवीण सूर्यवंशी, ॲड. देविदास बोरुळे पाटील, युनूस मोमीन, प्रा.प्रवीण कांबळे, यशपाल कांबळे, शिवाजी कांबळे, कुणाल वागज, अकबर माडजे, अभिषेक पतंगे, अभिजीत इगे, विष्णुदास धायगुडे, जालिंदर बर्डे, पवन सोलंकर, इस्रार पठाण, करीम तांबोळी, पवन गायकवाड, सुलेखा कारेपूरकर, शितल मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते